शंभर, वीस, दहा, पाचच्या नोटा रद्द होण्याच्या भितीने जमा करण्याकडे कल बॅंकांना मात्र आदेश नाही : नोटा खपविण्यासाठी अनेकांची धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2021 02:14 PM2021-01-27T14:14:52+5:302021-01-27T14:15:02+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : २०१६ मध्ये झालेल्या नोटबंदीच्या कटू आठवणी आजही अनेकांच्या मनात आहेत. आता पुन्हा १००, पन्नास, ...

Banks, however, are not commanded to deposit one hundred, twenty, ten, five notes for fear of cancellation: Many struggle to spend notes | शंभर, वीस, दहा, पाचच्या नोटा रद्द होण्याच्या भितीने जमा करण्याकडे कल बॅंकांना मात्र आदेश नाही : नोटा खपविण्यासाठी अनेकांची धडपड

शंभर, वीस, दहा, पाचच्या नोटा रद्द होण्याच्या भितीने जमा करण्याकडे कल बॅंकांना मात्र आदेश नाही : नोटा खपविण्यासाठी अनेकांची धडपड

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : २०१६ मध्ये झालेल्या नोटबंदीच्या कटू आठवणी आजही अनेकांच्या मनात आहेत. आता पुन्हा १००, पन्नास, दहा व पाचच्या नोटा बंद होण्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे व्यापारींकडून कुणी या नोटा घेण्यास तयार नाहीत. बॅंकांना अद्याप या बाबत काहीही सुचना मिळालेल्या नाहीत. या नोटा बंद करतांना टप्प्याटप्प्याने होतील तसा आदेशही अद्याप निघालेला नाही. त्यामुळे नागरिकांनी नोटा जमा करण्याची घाई करू नये असे आवाहन बॅंकांनी केले आहे.  
पाच ते १०० रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद होण्याची चर्चा सद्या सुरू आहे. याबाबत शासनाने अद्याप आदेश काढलेले नाहीत. असे असतांनाही या विषयाच्या चर्चेमुळे मात्र नागरिकांमध्ये आणि व्यापाऱ्यांमध्येही घबराट पसरली आहे. जुन्या नोटा जमा करण्यासाठी बॅंकामध्ये काहीजण जात आहेत. नियमित भरणा करण्यामध्ये या नोटा स्विकारल्या जात आहेत. गेल्या काही दिवसात जुन्या नोटा भरणामध्ये येण्याचे प्रमाण वाढल्याचेही बॅंकांनी स्पष्ट केले. 

बॅंकामध्ये वाढला जुन्या नोटांचा भरणा...
बॅंकामध्ये व्यापारी तसेच इतरा ग्राहकांकडून जुन्या नोटांचा भरणा वाढला आहे. बॅंका देखील त्या बिनधिक्कत स्विकारत आहेत. गेल्या काही दिवसात त्याचे प्रमाण वाढले आहे. नोटा बंदीचा मागील अनुभव वाईट असल्यामुळे नागरिक आता कुठलीही रिस्क घेण्यास तयार नाहीत. त्यामुळे प्रत्येकजण आपल्याकडील जास्तीत जास्त जुन्या नोटा खपविण्याच्या मार्गावर आहे. बॅंका जुन्या नोटा स्विकारत असल्या तरी ग्राहक कॅश काऊंटरवरून जुन्या नोटा घेण्यास तयार नसल्याचे चित्र आहे. 

नव्या नोटांची कॅश काऊंटरवर मागणी
राष्ट्रीयकृत तसेच खाजगी बॅंकामधील कॅश काऊंटरवर पाच रुपये ते १०० रुपयांच्या नव्या नोटांचीच मागणी वाढली आहे. काही वेळा कॅशीयरशी देखील वादविवाद होत आहेत. त्यामुळे काही बॅंकांनी जुन्या नोटा बंद झालेल्या नाहीत त्यामुळे त्या स्विकाराव्या अशा सुचनाच दर्शनी भागावर लावल्या असल्याचे दिसून येत आहे. 

अद्याप आदेश नाहीत... 
 पाच, दहा, २०, ५० व १०० रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बंद होतील याबाबत कुठलाही आदेश प्राप्त नाही. त्यामुळे या नोटांचा दैनंदिन व्यवहार सुरू असल्याची माहिती एका बॅंकेच्या अधिकारऱ्याने स्पष्ट केले. 

ग्राहकांकडून जुन्या नोटा दिल्या जातात, परंतु स्विकारल्या जात नसल्याने डोकेदुखी वाढली आहे. अद्याप काहीही निर्णय झालेला नाही. निर्णय झालाच तर तो टप्प्याटप्प्याने होईल त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये. तसेच नोटा स्विकाराव्या अशी अपेक्षा   आहे.   
-चंपालाल राठोड, व्यापारी.

शासनाने किंवा आरबीआयने अद्याप जुन्या नोटांबाबत काहीही निर्णय घेतलेला नाही. असे असतांनाही ग्राहकांसह काही व्यापारी देखील जुन्या नोटा स्विकारत नसल्याची स्थिती आहे. शासनाने निर्णय घेण्यापूर्वी नव्या नोटा त्या प्रमाणात उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.   
-श्यामजीभाई पटेल, व्यापारी.

Web Title: Banks, however, are not commanded to deposit one hundred, twenty, ten, five notes for fear of cancellation: Many struggle to spend notes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.