शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
2
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
3
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
4
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
5
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
6
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
7
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
8
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
9
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
10
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
11
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
12
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
13
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
14
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
15
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
16
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
17
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
18
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
19
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
20
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 

कर्जवाटपात बँकांचे पुन्हा ‘येरे माझ्या मागल्या’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2020 13:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात कर्जवाटपात बँकांकडून मागच्यावर्षाचाच कित्ता गिरवला गेल्याचे समोर आले आहे़ खोऱ्याने अर्ज करुनही निवडक ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात कर्जवाटपात बँकांकडून मागच्यावर्षाचाच कित्ता गिरवला गेल्याचे समोर आले आहे़ खोऱ्याने अर्ज करुनही निवडक शेतकऱ्यांना कर्ज देत बँकांनी वेळ मारुन नेली असून पाच महिन्यात ३४ टक्के शेतकºयांना पीक कर्ज वितरण करत काम पूर्ण करण्यात आले आहे़दरवर्षी जिल्ह्यातील पीक कर्ज वाटपाबाबत शेतकºयांकडून नाराजी व्यक्त करण्यात येते़ यात शेतकरी अर्ज करुनही बँका त्यांचे अर्ज नाकारत असल्याचे प्रकार घडले होते़ या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने यंदा राष्ट्रीयकृत, ग्रामीण आणि जिल्हा बँक यांच्या एकूण १०३ शाखांकडून कर्ज वाटप करण्यासाठी मेळावे घेतले होते़ यानंतर यंदा १०० टक्के कर्ज वाटप होणार असे चित्र निर्माण झाले होते़ या चित्रावर बँकांनीच पाणी फेरले असून आजअखेरीस केवळ १८ हजार शेतकºयांना पीक कर्ज देण्यात आले आहे़ जिल्ह्यात आठ राष्ट्रीयकृत बँका, चार खाजगी, एक ग्रामीण आणि एक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांना मिळून यंदा खरीप हंगामात ६१ हजार शेतकºयांना पीककर्ज देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ़ राजेंद्र भारूड यांच्याकडून देण्यात आल्या होत्या़ यावर बँकांच्या अधिकाºयांनीही संमती देत कर्ज वाटपास सुरूवात केली होती़ परंतु गेले पाच महिने सुरू असलेल्या पीक कर्ज वितरणाच्या कामकाजाने गती पकडली नसल्याने यंदाही ४० हजार शेतकरी पिक कर्जाविनाच आहेत़ जिल्हा बँकेने कर्ज वाटप टक्केवारीत वरचे स्थान प्राप्त केले असले तरी विकासो आणि वैयक्तिक खाते असे कर्ज वितरण केले असून एक लाख सभासद असलेल्या बँकेने केवळ ९ हजार शेतकºयांना कर्ज दिले आहे़ परंतु त्यापैकी केवळ ९ हजार शेतकºयांना यंदा कर्ज दिले गेले आहे़जिल्ह्यात एकूण १८ हजार ३८१ शेतकºयांना सर्व बँकांनी मिळून २०९ कोटी ४२ लाख रूपयांचे कर्ज आतापर्यंत वितरीत केल्याचे यातून स्पष्ट होत आहे़जिल्ह्यातील सहा तालुक्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून सर्वाधिक शेतकºयांना कर्ज दिले आहे़ यात शहादा २ हजार ८६२, नंदुरबार २ हजार ६७२, नवापूर ८५७, तळोदा २२५, धडगाव ३४१ आणि अक्कलकुवा तालुक्यात ४० खातेदारांना कर्ज दिल्याची माहिती आहे़राष्ट्रीयकृत बँकांच्या विविध शाखांकडून शहादा आणि नंदुरबार तालुक्यात चार हजार तर नवापूर आणि तळोदा तालुक्यात तीन हजार शेतकºयांना पीक कर्ज देण्यात आले आहे़ धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यात पीक कर्ज घेऊन शेती करण्याचे प्रमाण नगण्य आहे़ खाजगी बँकांनी वाटप केलेल्या कर्जात नंदुरबार आणि शहादा तालुक्यातील शेतकºयांचा वाटा अधिक आहे़ ग्रामीण बँकेकडून शहादा, तळोदा व नंदुरबार या तीन तालुक्यात कर्ज दिल गेले असल्याची माहिती देण्यात आली आहे़