जिल्ह्यातील बँड चालकांना अखेर मिळाली परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2020 10:03 PM2020-11-19T22:03:08+5:302020-11-19T22:03:20+5:30

n  लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  कोरोना  महामारीमुळे  बॅन्ड व्यवसाय पूर्णपणे बंद झाल्याने बँड कलाकार उत्कर्ष संघटना पुणे, नंदुरबार ...

The band drivers in the district finally got permission | जिल्ह्यातील बँड चालकांना अखेर मिळाली परवानगी

जिल्ह्यातील बँड चालकांना अखेर मिळाली परवानगी

Next

n  लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार :  कोरोना  महामारीमुळे  बॅन्ड व्यवसाय पूर्णपणे बंद झाल्याने बँड कलाकार उत्कर्ष संघटना पुणे, नंदुरबार जिल्हा बँड युनियनने  प्रशासनाला निवदन देत व्यवसायाला परवानगी देण्याची मागणी केली होती. या पाठपुराव्याला यश आले असून जिल्हाधिकारी यांनी बँड चालकांना व्यवसाय करण्याची मुभा दिली आहे.
 बँड युनियनचे  जिल्हाध्यक्ष  सुनिल पवार, शहराध्यक्ष सागर सोनवणे यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी  जिल्हाधिकारी यांची बुधवारी भेट घेतली होती. यावेळी जिल्हाधिका-यांनी  परवानगी पत्र देत अटी व शर्तीत राहून व्यवसाय करण्याचे पत्र दिले आहे. या पत्रात  जिल्ह्यामध्ये बँड पथक व्यवसायिकांना कार्यक्रमासाठी कोणतेही प्रतिबंधित आदेश पारित करण्यात आलेले नाहीत. जिल्ह्यातील सर्व बँड पथक व्यवसायिकांना लग्न समारंभामध्ये बँड वाजवण्यास परवानगी देण्यात येत आहे. एकाच ठिकाणी गर्दी न करता सामाजिक अंतर राखून बँड वाजवणे बंधनकारक राहील. सार्वजनिक ठिकाणी गर्दी होणार नाही. व रहदारीस कोणताही अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी. बँड पथकांमध्ये मालकांनी पथकातील सर्व सदस्यांचे नियमित थर्मल स्क्रिनिंग करून नोंद करणे बंधनकारक राहील. तसेच कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये या अनुषंगाने आवश्यक ती खबरदारी घेण्यात यावी आदी सूचना करण्यात आल्या आहेत. 
 

Web Title: The band drivers in the district finally got permission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.