शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

केळी व कापूस पिकाचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 12:53 IST

जावदा शिवारातील घटना : शेतक:यांमध्ये संताप, माथेफिरुंचा बंदोबस्त करण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कब्राrाणपुरी/म्हसावद : शहादा तालुक्यातील जावदा त.बो. शिवारातील केळीच्या बागेतील 55 ते 60 झाडे कापून नुकसान केल्याची घटना घडली. याबाबत संबंधित शेतक:याने म्हसावद पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, याच शेताजवळ एका शेतातील कापसाच्या झाडांचेही नुकसान अज्ञात माथेफिरुंनी केले आहे.याबाबत वृत्त असे की, जावदा  त.बो. येथील शेतकरी लीलाबाई यादव चौधरी यांच्या मालकीच्या सव्रे नं.5/2 या क्षेत्रात सहा एकर केळीची  लागवड केली आहे. रविवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास प्रशांत यादव चौधरी हे आपल्या शेतातून घरी आले. त्यानंतर पहाटे सहा वाजेच्या सुमारास ते पुन्हा शेतात गेले असता त्यांना शेतातील 55 ते 60 केळी झाडे कापलेली दिसून आल्याने त्यांना धक्काच बसला. संबंधित शेतक:याचे सुमारे 30 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. याबाबत चौधरी यांनी ताबडतोब म्हसावद पोलीस स्टेशनला अज्ञात माथेफिरूविरूद्ध तक्रार दाखल केली आहे.  चौधरी यांच्या शेतालगतच असलेल्या मनोज पदमसिंह गिरासे यांच्या शेतातही 20 ते 25 कापसाची झाडे कापून नुकसान केले आहे. त्यामुळे शेतक:यांमध्ये संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. या परिसरात काढणीवर आलेल्या पिकांची चोरी, केळी, पपई व कापसाच्या झाडांचे नुकसान व शेती साहित्याची चोरी या घटना नेहमीच्याच झाल्या असल्याने शेतक:यांचे मोठय़ा प्रमाणावर आर्थिक नुकसान होत आहे.  वारंवार घडणा:या या घटनांबाबत पोलिसांकडे   वेळोवेळी लेखी व तोंडी कळवूनही या अज्ञात माथेफिरूंचा बंदोबस्त करण्यात येत नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. अशा घटनांकडे आता जिल्हा पोलीस दलाच्या वरिष्ठ अधिका:यांनी गांभीर्याने लक्ष देवून त्वरित या माथेफिरूंचा बंदोबस्त करावा, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.