बामखेडा ग्रामपंचायतीवर ग्रामविकास पॅनलचे वर्चस्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:31 AM2021-01-20T04:31:58+5:302021-01-20T04:31:58+5:30

शहादा तालुक्यातील बामखेडातर्फे तऱ्हाडी येथे ११ जागांसाठी २२ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. बामखेडा गावातील एकूण २ हजार ३७२ पैकी ...

Bamkheda Gram Panchayat is dominated by Gram Vikas Panel | बामखेडा ग्रामपंचायतीवर ग्रामविकास पॅनलचे वर्चस्व

बामखेडा ग्रामपंचायतीवर ग्रामविकास पॅनलचे वर्चस्व

Next

शहादा तालुक्यातील बामखेडातर्फे तऱ्हाडी येथे ११ जागांसाठी २२ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. बामखेडा गावातील एकूण २ हजार ३७२ पैकी १ हजार ९८४ जणांनी मतदानाचा हक्क बजावला होता. तब्बल ८३ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असल्याने निवडणूक चुरशीची होईल असा अंदाज होता. हा अंदाज तंतोतंत खरा ठरुन ग्रामविकास पॅनलने आठ ठिकाणी विजयी मिळवला. विरोधी जय किसान पॅनलला तीन ठिकाणी विजय प्राप्त करता आला. पॅनल प्रमुख मनोज चौधरी व विद्यमान सरपंच प्रा. लीना मनोज चौधरी हे पती-पत्नीही निवडणूकीत विजयी झाले. ही निवडणूक अनेक कारणांनी ग्रामस्थांच्या लक्षात राहणार आहे. यात प्रमुख कारण म्हणजे पॅनल प्रमुख मनोज चौधरी यांची २० वर्षे माजी सरपंच शिवदास चौधरी यांच्या विरोधात प्रभाग क्रमांक दोन मधून उमेदवारी अर्ज दाखल करुन निवडणूक लढवत खळबळ उडवून दिली होती. या प्रभागात त्यांचे मतदान नसतानाही त्यांनी उमेदवारी करत निवडणूकीत चुरस आणली होती. मनोज चौधरी यांनी बाजी मारत ३४२ मते मिळवत शिवदास चाैधरी यांना पराभूत केले होते. मावळत्या सरपंच लीना चाैधरी यांनही प्रभाग तीनमधून विजय मिळवला होता. निवडणुकीत दोन्ही गटाने एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करून निवडणुकीत चुरस आणली. पहिल्या दिवसापासून ग्रामविकास पॅनल व जय किसान पॅनल प्रमुख व कार्यकर्ते उत्साहात होते. परंतु मतदानाची झालेली जास्तीची टक्केवारी ही ग्रामविकास पॅनलच्या पथ्यावर पडली. दरम्यान या निवडणुकीत जय किसान पॅनलच्या कांचनबाई भिल या प्रभाग १ व ४ या दोन्ही ठिकाणी नशीब अजमावत होत्या. परंतु प्रभाग एकमध्ये मध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. प्रभाग एकमध्ये १४२ मते मिळाली तर त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार प्रमिलाबाई भिल ह्या ३०२ मते मिळवून विजयी झाल्या. प्रभाग चारमध्ये कांचनबाई भिल विजयी झाल्या.

Web Title: Bamkheda Gram Panchayat is dominated by Gram Vikas Panel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.