लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : भोंदू बाबांच्या चमत्कार व अन्य अंधश्रद्धेवर जनजागृती करण्यासाठी समाजकल्याणच्या मुलींच्या शासकीय निवासी शाळेत पथनाट्य सादर करण्यात आले. त्यातून विद्यार्थ्यांमधील समज-गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला.समाजातील अज्ञान व अंधश्रद्धेचा गैरफायदा घेत हे भोंदू बाबा चमत्कार दाखवून लोकांना फसवतात. त्या चमत्कारांचे या नाटिकेतून व विविध प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. यातून भोंदू बाबांचे प्रयोग हे चमत्कार नसून केवळ विज्ञानाच्या विविध नियमांचा वापर करून लोकांची फसवणूक होत असल्याचे सिद्ध करण्यात आले.हे नायक अधिक्षिका सुषमा मोरे यांनी वैभवी मोरे, निकिता बागुल, प्रीती सामुद्रे, प्रियंका कुवर, कोमल शिरसाठ, मानसी बिराडे, नयना अहिरे, प्रतिभा सामुद्रे या विद्यार्थिनींच्या मदतीने सादर केली.यावेळी अधिक्षिका सुषमा मोरे यांनी मार्गदर्शन करतांना विद्यार्थिनींना अंधश्रद्धेस बळी न पडता विज्ञानवादाची कास धरा, असे आवाहन केले. प्रयोग सादरीकरण साठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्या सुवर्णा जगताप यांनी मदत केली. शालेय विद्यार्थिनींनी सादर केलेल्या या प्रयोगास चांगला प्रतिसाद मिळाला.
पथनाट्यातून अंधश्रद्धेवर जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2020 12:50 IST