जिल्ह्यातील 21 गावांमध्ये बालविवाह प्रतिबंधक संदर्भात जनजागृती मोहिम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2019 12:49 PM2019-11-18T12:49:05+5:302019-11-18T12:49:16+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : लोकांना बालहक्क रक्षणाचे आणि बालविवाह प्रतिबंधाचे महत्व याबद्दल माहिती देण्यासाठी  राज्यातील 25 जिल्ह्यांतील 850 ...

Awareness campaign on prevention of child marriage in 21 villages in the district | जिल्ह्यातील 21 गावांमध्ये बालविवाह प्रतिबंधक संदर्भात जनजागृती मोहिम

जिल्ह्यातील 21 गावांमध्ये बालविवाह प्रतिबंधक संदर्भात जनजागृती मोहिम

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : लोकांना बालहक्क रक्षणाचे आणि बालविवाह प्रतिबंधाचे महत्व याबद्दल माहिती देण्यासाठी  राज्यातील 25 जिल्ह्यांतील 850 गावांची निवड करण्यात आली असून त्यात नंदुरबार जिल्ह्यातील 21 गावाचा समावेश आहे.
बालदिनाचे औचित्य साधत या मोहिमेचा तिसरा आणि शेवटचा टप्पा28 नोव्हेंबरला संपणार आहे. या दरम्यान मुलांसाठी जिल्हास्तरावर वेगवेगळे कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. शाळेमधील मुलांच्या गैरहजेरीबाबत आढावा घेण्यात येणार आहे. विद्याथ्र्यांना शैक्षणिक माहितीपट दाखविण्यात येतील. गावातील बालगट, किशोरगट, महिला मंडळ, बालसभा यांच्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. तसेच या अंतिम टप्प्यात ग्रामस्थांना बालविवाह प्रथेचे अनिष्ट परिणाम समजावून सांगितले जात आहेत. असे विवाह रोखण्यासाठीच्या कायद्यांची आणि इतर उपाययोजनांची माहिती देखील दिली जात आहे. 
बालविवाह कसे घातक असतात आणि असा एखादा विवाह होत असेल तर त्याची माहिती सरकारी आणि प्रशासकीय यंत्रणेला कशी द्यायची याबद्दल ग्रामस्थांना प्रशिक्षिण देखील देण्यात आले. या मोहिमेचा पहिला टप्पा 15 ऑगस्ट ला सुरु झाला. या टप्प्यात अगदी तळागाळातील गावक:यांना समस्यांची माहिती दिली व यासाठी ग्रामसभा भरविल्या गेल्या. अशा सभांमध्ये बालहक्कांचे प्रभावीपणे रक्षण करण्यासंबंधीचे ठराव संमत केले. तर दुसरा टप्पा 11 ऑक्टोबरला म्हणजे आंतरराष्ट्रीय बालिका दिनाच्या दिवशी सुरु झाला. यामध्ये बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेच्या अमलबजावणीवर लक्ष केंद्रित केले गेले. बालविवाह या समस्येशी संबंधित मुद्यांवर चर्चा करण्यासाठी शाळांमध्ये बैठका घेतल्या. तसेच बचतगट कार्यकत्र्यांशी बालविवाह समस्येविषयी चर्चा केली. युनिसेफचे अधिकारीही या प्रक्रियेत सहभागी झाले.

Web Title: Awareness campaign on prevention of child marriage in 21 villages in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.