विद्यापीठ कार्यक्षेत्रातील उत्कृष्ट कार्य करणारे प्राचार्य, महाविद्यालय, शिक्षक, कर्मचारी व संशोधकांचा कार्य गौरव पुरस्कार प्रदान सोहळा विद्यापीठात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात सन २०१७-१८ व २०१८-१९ या वर्षातील उत्कृष्ट कार्य गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले. सन २०१७-१८ यावर्षी जाहीर झालेला उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या कला, विज्ञान व वाणिज्य वरिष्ठ महाविद्यालयातील चतुर्थश्रेणी कर्मचारी गणेश मंगा पाटील (रा. प्रकाशा, ता. शहादा) यांना कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन, जळगावचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत, पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे, व्यवस्थापन परिषद सदस्य तथा शहादा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. एस. पाटील, प्र-कुलगुरू प्रा. बी. व्ही. पवार आदींच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. प्रमाणपत्र व ट्रॉफी असे पुरस्काराचे स्वरूप होते. कोविड-१९ चे सर्व नियम पाळून कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. जी. ए. उस्मानी व प्रा.आशुतोष पाटील यांनी केले. आभार प्र. कुलसचिव प्रा. ए. बी. चौधरी यांनी मानले.