शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासाठी ग्रामस्थांचे रात्रभर जागरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 11:06 IST

राधेश्याम कुलथे ।  लोकमत न्यूज नेटवर्क ब्राrाणपुरी : शहादा तालुक्यातील गोदीपूर गावाला पाणीपुरवठा करणारी कूपनलिका आटल्याने ग्रामस्थांना तीव्र पाणीटंचाईला ...

राधेश्याम कुलथे । लोकमत न्यूज नेटवर्कब्राrाणपुरी : शहादा तालुक्यातील गोदीपूर गावाला पाणीपुरवठा करणारी कूपनलिका आटल्याने ग्रामस्थांना तीव्र पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. गावापासून अर्धा किलोमीटर अंतरावर शेतातील खाजगी कूपनलिकेतून ग्रामस्थांना पाणी आणावे लागत आहे. मात्र दिवसा वीजपुरवठा होत नसल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी रात्रभर जागरण करावे लागत आहे.शहादा तालुक्यात पाणीटंचाईने ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. सार्वजनिक नळ योजना कूचकामी ठरल्या असून बंधारे, गाव तलाव आटले आहेत. संपूर्ण तालुक्यात ही परिस्थिती आहे. या पाश्र्वभूमीवर ग्रामस्थ पाणी कुठून आणतात? टंचाईच्या काळात ते दिवस कसे काढतात? प्रशासन त्यांच्या मदतीला धावले का? या सर्व प्रश्नांवर शहादा तालुक्यातील गोदीपूर येथे पाहणी केली असता या गावात सर्व कूपनलिका कोरडय़ा झालेल्या दिसून आल्या. येथील ग्रामस्थांशी चर्चा केली असता त्यांनी सांगितले की, दिवसा वीजपुरवठा होत नसल्याने रात्री नऊ वाजता गावाजवळील अर्धा ते एक किलोमीटर अंतरावर शेतातील वीजपुरवठा सुरू होतो. तेथे रात्री पाणी भरण्यासाठी रात्रभर जागरण करावे लागत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. याठिकाणी रात्री दहा वाजेच्या सुमारास भेट दिली असता सर्व गोदीपूर गाव आजूबाजूच्या शेतात पाणी भरण्यासाठी तुटून पडलेले दिसून आले. जवळील अर्धा ते एक किलोमीटर अंतरावर असलेल्या शेतात रात्री वीज आल्यावर पाण्यासाठी लगबग करावी लागते. महिला-पुरुषांसह आबालवृद्ध व लहान मुले डोक्यावर हंडे घेऊन शेताच्या दिशेने निघतात.पाण्यासाठी रात्र जागून काढल्याने अनेकवेळा दिवसा काम करणे शक्य होत नाही. परिणामी आर्थिक झळही सहन करावी लागत आहे. निवडणुका आल्या की लोकप्रतिनिधी फक्त मते मागण्यासाठी येतात. आता ग्रामस्थांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे मात्र कोणत्याही पक्षाचा  पुढारी उपाययोजनेसाठी फिरकत नसल्याची संतप्त प्रतिक्रिया एका वृद्ध महिलेने व्यक्त केली.  प्रशासनाने गोदीपूर येथील पाणीटंचाईवर प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.