शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा ट्विस्ट...! 'ॲक्सिस माय इंडिया'कडून पश्चिम बंगालचा एक्झिट पोल जाहीर करण्यास नकार, अंदाजच येईना...
2
सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड...
3
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
4
"एकनाथ शिंदेंनी हुल दिली अन् उद्धव ठाकरे..."; विधान परिषदेवरुन ज्योती वाघमारेंनी उडवली खिल्ली
5
Bank Holidays in May: मे महिन्यात १३ दिवस बँका राहणार बंद; कोणत्या राज्यात केव्हा असेल सुट्टी?
6
बागेत प्रियकरासोबत रोमान्स करत होती २ मुलांची आई, गावकऱ्यांनी दोघांना पाहिलं अन् पुढे असं काही केलं...
7
Buddha Purnima 2026 Wishes: बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा बुद्ध जयंती!
8
तिढा सुटला, विधान परिषद निवडणुकीतून काँग्रेसची माघार, अंबादास दानवे असतील मविआचे उमेदवार
9
महायुती-महाविकास आघाडीचे ठरले; पाहा, विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी संपूर्ण उमेदवारांची यादी
10
Vastu Shastra: प्रगतीचे मार्ग मोकळे करायचे आहेत? मग तुमच्या घरातील 'हे' वास्तू दोष त्वरित दूर करा!
11
पश्चिम बंगालमध्ये भल्या भल्यांना कोडे सुटेना! ५१ लाख मतदार घटले तरी ३० लाख मते वाढली; ९३% मतदानाचा रेकॉर्ड कोणाचे टेन्शन वाढवणार?
12
"माझ्यावर हसतोय?" कुर्ल्यात तरुणावर चाकूनं सपासप वार, भररस्त्यात घडलेल्या घटनेनं खळबळ!
13
पुतिन-ट्रम्प यांची फोनवर चर्चा; युरेनियम रशियाला देण्याची ऑफर अमेरिकेने नाकारली! इराणचं टेन्शन वाढलं
14
अमेरिकेने भारताला परत केल्या ६५७ प्राचीन मूर्ती, अमूल्य ठेव्याची एवढी आहे किंमत 
15
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! उद्या शेअर बाजारात कामकाज होणार का? ट्रेडिंगपूर्वी चेक करा नवं हॉलिडे कॅलेंडर
16
मोठी बातमी! बच्चू कडू यांनी शिवसेनेचं धनुष्यबाण घेतले हाती; "झेंडा बदलला पण अजेंडा नाही.."
17
रियान परागला मोठा धक्का! ड्रेसिंग रूममध्ये स्मोकिंग केल्याप्रकरणी BCCIने केली कठोर कारवाई
18
खिशात कांदा ठेवल्याने खरोखरच 'उष्णता' लागत नाही का? जाणून घ्या उन्हाळ्यातील या सर्वात मोठ्या दाव्यामागचं वास्तव!
19
माचिसची काडी पेटवली अन् भडका उडाला, सिलेंडरच्या स्फोटात कुटुंबातील ७ जण होरपळले
20
काय म्हणावं आता! लग्नात इतक्या जोरात डीजे वाजवला की १४० कोंबड्या मेल्या; मालक चिडला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

आज ‘व्यायाम’वर होणार जागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2020 13:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जागतिक सुर्यनमस्कार दिनानिमित्त जिल्ह्याती विविध शाळा-महाविद्यालय व क्रीडा कार्यालयामार्फत व्यायाम व योगाच्या जनजागृतीसाठी विविध ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जागतिक सुर्यनमस्कार दिनानिमित्त जिल्ह्याती विविध शाळा-महाविद्यालय व क्रीडा कार्यालयामार्फत व्यायाम व योगाच्या जनजागृतीसाठी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.जिल्हा क्रीडा कार्यालयामार्फत जी. टी. पी. महाविद्यालयाच्या प्रांगणात १ फेबुवारी रोजी विविध कार्यक्रम घेण्यात येणार असल्याचे क्रीडाधिकारी सुनंदा पाटील यांनी कळविले. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तर प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणीही कार्यक्रम होणार आहे.व्ही.के.शाह विद्यालय, शहादासुदृढ आरोग्यासाठी सूर्यनमस्काराचे महत्त्व आहे. म्हणून शहादा येथील सन्मित्र बहुउद्देशीय क्रीडा मंडळ व शेठ व्ही.के. शाह विद्यालयातर्फे विश्रामकाका शैक्षणिक संकुलात सामूहिक सूर्यनमस्कार उपक्रम राबविण्यात आला.मकरसंक्रांत ते रथसप्तमी हा सूर्याच्या उपासनेचा खास कालखंड. समस्त प्राणीमात्रांच्या उर्जेचे स्त्रोत म्हणजे सूर्य. सूर्याच्या उपासनेचे व निरोगी जीवनाचे विद्यार्थ्यांवर संस्कार व्हावेत, आपल्या प्राचीन संस्कृतीचा अभिमान निर्माण व्हावा हा यामागील उद्देश होता. त्यात विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्तीने शिस्तबद्धरित्या सहभाग नोंदवला. प्राचार्य सी.व्ही. चौधरी, सन्मित्र बहुउद्देशीय क्रिडा मंडळाचे अध्यक्ष प्रा.ज्ञानी कुलकर्णी, उपमुख्याध्यापक एस.डी. भोई, पर्यवेक्षक आय.एन. चौधरी, प्राथमिकच्या मुख्याध्यापिका शोभना पाटील, विकास प्राथमिक विद्या मंदिराचे मुख्याध्यापक विशाल तांबोळी आदी उपस्थित होते.