मोलगी दूरसंचार कार्यालयाला ठोकले टाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2020 01:07 PM2020-02-16T13:07:21+5:302020-02-16T13:07:33+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क वाण्याविहीर : मोलगी येथे बीएसएनएल रेंजअभावी अनेक कामे रखडत आहे. ग्राहकांना संपर्काची सेवाच मिळत नसल्याने संतप्त ...

Avoid hitting the telecommunications office | मोलगी दूरसंचार कार्यालयाला ठोकले टाळे

मोलगी दूरसंचार कार्यालयाला ठोकले टाळे

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाण्याविहीर : मोलगी येथे बीएसएनएल रेंजअभावी अनेक कामे रखडत आहे. ग्राहकांना संपर्काची सेवाच मिळत नसल्याने संतप्त ग्राहकांनी मोलगी ता. अक्कलकुवा येथील बीएसएनएलच्या कार्यालयालाच टाळे ठोकले. परंतु दोन दिवसात सेवा सुरळीत करण्याचे आश्वासन दिल्यामुळे नागरिकांमार्फत कार्यालय पुन्हा उघडण्यात आले.
अवघ्या देशात डिजिटल इंडियाचे वारे वाहत असले तरी धडगाव व मोलगीचा भाग त्याला अपवाद ठरत आहे. वारंवार खंडीत होणाऱ्या सेवेचा सामना करीत असतांनाच दोन आठवड्यापासून मोलगी टॉवरमार्फत दिली जाणारी सेवा पूर्णत: कोलमडली, सर्व आॅनलाईन कामे अनेक दिवसांपासून ठप्प झाली आहे. महत्वाची कामे पुढे करीत नर्मदा काठ व सातपुड्याच्या दºया खोºयातील मैलोची पायपीट करीत नागरिक मोलगी येथे येत आहे परंतु बीएसएनएलची सेवाच बंद पडल्यामुळे त्यांची कामे होत नाही. त्या नागरिकांना आल्यापावली परतावे लागत आहे.
दुरसंचारच्या भोंगळ कारभार व सेवेमुळे संतप्त नागरिकांनी मोलगी कार्याललयालाच टाळे ठोकले. यावेळी भाजपाचे सुनिल राहसे जिगर पाडवी, बलवंत वसावे, शिरीष वसावे, राजा अहिरे, अशोक वसावे, चुन्नू सय्यद, राजू परदेशी, गोकुळ भारद्वाज, बंटी पाटील, किशोर अहिरे या ग्रामस्थांनी कुलुप ठोकले. मात्र सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोहर पगार यांनी बीएसएनएलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधत दोन दिवसात सेवा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे कार्यालय पुन्हा उघण्यात आले.

Web Title: Avoid hitting the telecommunications office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.