शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कापूस खरेदीच्या दिवशीच बंद पाडली लिलाव प्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2019 12:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : अवकाळी पाऊस आणि आणि ढगाळ वातावरण कापूस उत्पादक शेतक:यांच्या जिवावर उठले आहे. कापूसमध्ये अपेक्षेपेक्षा ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : अवकाळी पाऊस आणि आणि ढगाळ वातावरण कापूस उत्पादक शेतक:यांच्या जिवावर उठले आहे. कापूसमध्ये अपेक्षेपेक्षा अधीक ओल असल्यामुळे सीसीआयने कापूसभाव कमी देवू केल्याने शेतक:यांनी खरेदी शुभारंभाच्या दिवशीच लिलाव प्रक्रिया बंद पाडल्याचा प्रकार नंदुबारात घडला. दरम्यान, 18 ते 20 टक्के दरम्यान ओलावा असलेला कापूस किमान हमी भावाने खरेदी करावा अशी मागणी नंदुरबार बाजार समितीने जिल्हाधिकारी व जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे केली आहे.  सीसीआयचा कापूस खरेदीचा शुभारंभ बाजार समितीच्या राजीव गांधी सुतगिरणी येथे गुरुवारी झाला. उद्योगपती मनोज रघुवंशी यांच्या हस्ते कापूस गाडी आणि वजन काटा पूजन करून शुभारंभ झाला. पहिल्याच दिवशी कापूस भरून 70 वाहने दाखल झाली होती. परंतु एकाही वाहनातील कापूस लिलाव न होताच परत गेला. 12 टक्केच्या आत ओल हवीकापसात किमान 12 टक्केच्या आत ओलावा हवा असतो, परंतु शेतक:यांनी आणलेल्या कापसात 18 टक्केपेक्षा जास्त ओलावा आढळून आला. त्यामुळे सीसीआय अर्थात भारतीय कपास निगमने हा कापूस कमी भावात अर्थात केवळ चार हजार ते चार हजार 200 रुपये भाव देवून खरेदी करण्याचा प्रय} केला. याला शेतक:यांनी तीव्र विरोध केला. जो कापूस भाव जाहीर केला आहे त्यानुसारच भाव दिला गेला पाहिजे अशी मागणी शेतक:यांनी लावून धरली. परिणामी लिलाव होऊ शकला नाही.बाजार समितीची मागणीयाबाबत बाजार समितीचे सभापती किशोर पाटील यांनी जिल्हाधिकारी आणि जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, 14 रोजी सीसीआय व बाजार समिती परवानाधारक कापूस खरेदीदार यांच्याद्वारे कापूस खरेदीचा शुभारंभ झाला. परंतु मागील आठ ते दहा दिवसात तालुक्यात अवकाळी पाऊस आणि शेतातील कापूस   ओला झाला आहे. सीसीआयच्या 12 टक्के र्पयत ओलावा या मापदंडात न बसल्यामुळे सीसीआयचे अधिकारी यांनी एकही वाहन शासनाच्या हमी भावाने खरेदी केले नाही. बाजार समितीच्या खरेदीदार यांनी चार हजार ते चार हजार 200 रुपे भाव देऊ केल्याने शेतकरी संतापले. परिणामी लिलाव प्रक्रिया झाल नाही. त्यामुळे अवकाळी पाऊस आणि वातावरणातील आद्रता यामुळे शेतातील कापसाचे काढणीनंतर नैसर्गिकरित्या ओलावा 18 ते 20 टक्के दरम्यान असून भारतीय कपास निग ही केंद्र शासनाची किमान आधारभूत किंमतीने खरेदी करणारी    जिल्ह्यातील एकमेव संस्था आहे. त्यांनी निर्धारित केलेले मापदंड तात्काळ शिथील करून शेतक:यांचा 18 ते 20 टक्के दरम्यान ओलावा असलेला कापूस किमान हमी भावाने खरेदी करण्याचे आदेशीत करावे अशी मागणी या  निवेदनात किशोर पाटील यांनी केली आहे. घरातच कापूस पडूनशेतक:यांनी कापूस वेचणीनंतर तो घरातच भरून ठेवला आहे. सध्याचे आद्रतायुक्त वातावरण पहाता त्यात ओल दिसून येत आहे. परंतु ती 18 ते 20 टक्केर्पयत जात असल्याने कापसाला कमी भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. परिणामी शेतक:यांचा कापूस घरातच पडून आहे. 

सीसीआयने किमान 5450 ते 5550 हा दर जाहीर केला आहे. त्यात बन्नी व ब्रम्हा कापसाला 5550 तर एच-4, एच-6, आरसीएच 2 या कापसाला 5450 रुपये दर आहे. सीसीआयतर्फे किमान 12 टक्के ओलावा ग्राह्य धरला जातो. परंतु आज आलेल्या कापसात 18 ते 20 टक्के ओलावा असल्याचे व्यापा:यांचे म्हणने होते. त्यामुळे भाव कमी दिला जात होता.यंदा कापूस खरेदी उशीराने झाली आहे. खेडा खरेदीतील व्यापारी फसवणूक करीत आहेत. त्यामुळे शेतक:यांचा कापूस अद्यापही घरातच भरून पडलेला आहे.