शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे सुपुत्र बी. आर. गवई देशाचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ
2
भाजपा मंत्र्याच्या नेमप्लेटवर शाई, काँग्रेसची निदर्शनं; कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत वादग्रस्त विधान भोवलं
3
Video: भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीचे श्रेय घेणारा अमेरिका दहशतवादाच्या प्रश्नावर गप्प...
4
सरन्यायाधीशांना मिळतो पंतप्रधानांपेक्षा जास्त पगार; सोबत भत्ते आणि मिळतात 'या' खास सुविधा
5
कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपा मंत्र्याला दणका; वरिष्ठांचे आदेश आले, अन्...
6
रितेश देशमुखनं विचारलं 'मोठं होऊन काय होणार?' लहानग्याचं उत्तर ऐकून तुम्हालाही वाटेल अभिमान!
7
बर्फ वितळेल, जास्त पाऊस पडेल, गंगा नदीचा प्रवाह ५० टक्क्यांनी वाढेल..; IIT रुरकीचा रिपोर्ट
8
विराटशिवाय 'टेस्ट' झाली फिकी; प्रीती झिंटानं बोलून दाखवली मनातली गोष्ट
9
पाकिस्ताननं जितक्या रकमेसाठी IMF मध्ये नाक कापून घेतलं, भारताला त्यापेक्षा अधिक तर 'गिफ्ट'च मिळणारे; प्रकरण काय?
10
अनुष्का सेनवर चिडला नील नितीन मुकेश? आगामी सीरिजच्या प्रमोशनल इव्हेंटमधील व्हिडिओ व्हायरल
11
एकामागोमाग एक दिग्गज कंपन्या निर्णय घेतायत; मायक्रोसॉफ्ट ६००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार
12
Rohit Sharma : कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित शर्मा मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, कारण काय ?
13
ब्रेकअपनंतर प्रेयसीचे ’तसले’ व्हिडीओ पॉर्न साईटवर? कोल्हापूरच्या प्रियकरावर पुण्यात गुन्हा
14
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आता बुलेटप्रुफ कारमधून ये-जा करणार; पाकिस्तानमुळे वाढली सुरक्षा
15
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू
16
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
17
कोण आहे कशिश चौधरी?; वयाच्या २५ व्या वर्षी या हिंदू मुलीनं पाकिस्तानात रचला इतिहास
18
भारत-पाकिस्तान तणावामुळे आलिया भटने घेतला हा मोठा निर्णय, वाचून कराल तिचं कौतुक
19
हेअर ट्रान्सप्लांटमुळे एक नव्हे २ इंजिनिअरचा मृत्यू; डॉ. अनुष्का तिवारीचा नवा कांड उघड
20
Stock Market Today: या वृत्तानं बदलला बाजाराचा मूड; १३० अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स, IT-Metal स्टॉक्समध्ये तेजी

कोंबडी चोरांसह अट्टल गुन्हेगार पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2020 11:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : एलसबीच्या पथकाने शहरात घरफोडीच्या प्रयत्नातील तिघांसह अडीच लाखांच्या कोंबड्या चोरुन त्यांची विल्हेवाट लावणाऱ्या टोळीला ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : एलसबीच्या पथकाने शहरात घरफोडीच्या प्रयत्नातील तिघांसह अडीच लाखांच्या कोंबड्या चोरुन त्यांची विल्हेवाट लावणाऱ्या टोळीला ताब्यात घेतले आहे़ एलसीबीने नियुक्त केलेल्या तीन वेगवेगळ्या पथकांनी तब्बल सात गुन्हेगारांना ताब्यात घेतले आहे़ताब्यात घेतलेल्या चोरट्यांपैकी एकाने तब्बल १७ जिल्ह्यात घरफोडी केल्याची कबुली दिली असून त्याचे दोन साथीदार पळून जाण्यात यशस्वी झाले़ तर पथकांनी बसस्थानक परिसरातून दोघा मोबाईल चोरट्यांना अटक केली़ज्ञानदिप सोसायटीत अटकगेल्या सहा महिन्यात नंदुरबार जिल्ह्यातील शहरी भागात घरफोडीचे गुन्हे वाढीस लागल्याने पोलीसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते़ यानुसार घरफोडीच्या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत यांच्या मार्गदर्शनात एलसीबीने पथके तैनात केली होती़ दरम्यान नववर्षाच्या प्रारंभीच १ जानेवारी रोजी पोलीस निरीक्षक किशोर नवले यांना शहरातील धुळे रोडवरील ज्ञानदिप सोसायटी भागात एक अज्ञात चोरटा फिरत असल्याची माहिती मिळाली होती़ यानुसार पथकाने या भागात भेट देऊन माहिती घेतली असता, काळी बॅग पाठीशी लावलेला एक व्यक्ती फिरत असल्याचे दिसून आले़ त्याचा पाठलाग करुन पथकाने त्याला ताब्यात घेतले असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे देत निसटण्याचा प्रयत्न केला़ पथकाने त्याला ताब्यात घेत चौकशी करुन बॅगची तपासणी केली असता, घरफोडीचे साहित्य मिळून आले होते़ त्याने इंदौर येथून दोन साथीदारांसह आल्याची माहिती देत शहर व शहराबाहेरील बंद घरांची पाहणी करुन चोरी करत असल्याची माहिती दिली़पथकांनी त्याची अधिक चौकशी केली असता, धक्कादायक माहिती समोर आली़ ताब्यात घेतलेल्या चोरट्याचे नाव रोहित ऊर्फ अमित यादाव घनश्याम पाल रा़पांड्याखेडी उज्जैन असे असून त्याने साथीदार पवन ऊर्फ भुरा रामदास आर्य रा़ इंदौर व मनोज ऊर्फ राहुल ठाकुरदास कुमार रा़ भिंड (मध्यप्रदेश) यांच्यासोबत राज्यातील १७ जिल्ह्यांमध्ये ४२ ठिकाणी घरफोडी केल्याची केल्याची कबुली दिली़ त्याच्याकडून ३७ हजार रुपये रोख आणि घरफोडी करण्याचे साहित्य पोलीसांनी ताब्यात घेतले़मोबाईल चोरटे अटकेतअट्टल घरफोड्या आणि कोंबडीचोरांसोबत एलसीबीच्या पथकांनी दोन अट्टल मोबाईल चोर ताब्यात घेतले़ नंदुरबार बसस्थानक आवारात महागडे मोबाईल कमी दरात विक्री होत असल्याची माहिती एलसीबीला मिळाली होती़ त्यानुसार पथकाने याठिकाणी सापळा रचला असता दोघे मोबाईल विकत असल्याचे दिसून आले़ त्यांना ताब्यात घेतल्यावर त्यांच्याकडून ९८ हजार रुपये किमतीचे तब्बल १२ मोबाईल जप्त करण्यात आले़ हे मोबाईल त्यांनी सारंगखेडा यात्रोत्सव, नंदुरबार, धुळे आणि गुजरात राज्यातून चोरल्याची कबुली दिली आहे़ अंकुश ढेम्या पवार रा़ मुखेड जि़नांदेड व शंकर कमलाकर चव्हाण रा़ सेंधवा अशी दोघांची नावे आहेत़ त्यांच्याकडून चोरीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे़पोलीस अधिक्षक संजय पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक किशोर नवले यांच्यासह वेगवेगळ्या तीन पथकांनी चोरट्यांना ताब्यात घेत तिघे गुन्हे उघडकीस आणले़अडीच हजार कोंबड्या चोरणारे तिघांची टोळी जेरबंदनंदुरबार तालुक्यातील पाचोराबारी शिवारातील कासिम कय्यूम खाटीक यांच्या मालकीच्या पोल्ट्री फार्ममधून १ लाख ४६ हजार ९६० रुपयांच्या २ हजार ६७२ कोंंबड्या १७ डिसेंबर रोजी चोरीस गेल्याची घटना उघडकीस आली होती़ याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता़ दरम्यान घटनेमुळे पोल्ट्री फार्म चालकही धास्तावले होते़ या घटनेचा तपास एलसीबीकडे सोपवण्यात आला होता़ एलसीबीचे पोलीस निरीक्षक नवले यांच्या मार्गदर्शनात पथकांनी शहराबाहेरील तसेच परराज्यातील विविध टोलनाक्यांची तपासणी करुन माहिती घेतली होती़ यात सोनगड (गुजरात) येथील टोलनाक्यावरच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये १० संशयास्पद वाहने आढळून आले होते़ यातील एक वाहन हे नंदुरबार शहरातील अन्वर शेख समीर याच्या मालकीचे असल्याचे समोर आले़ पथकाने त्याला २८ डिसेंबर रोजी ताब्यात घेत विचारपूस केली असता, त्याने १७ डिसेंबरच्या रात्री खामगाव शिवारातून कोंबड्या चोरी करुन अहमदाबाद येथील अस्लम नवाबखान रहीमखान पठाण याच्याकडे पोहोचवल्या होत्या़ यासाठी अन्वर यास मोहिनोद्दीन नामक व्यक्तीने २० हजार रुपये दिले होते़ पथकाने अहमदाबाद येथे जावून नवाबखान रहीमखान याच्याकडून कोंबड्या चोरी करण्यासाठी वापरलेली जीजे १६ झेड ८९८२ हे चारचाकी वाहन ताब्यात घेण्यात आले़ पथकांनी गुन्ह्यात सक्रीय असलेले जावेद शहा आरीफ शहा, मोहिनोद्दीन सलाउद्दीन काझी, संतोष मंगल ठाकरे व अन्वर अल हक शेख समीर सर्व नंदुरबार यांना ३० डिसेंबर रोजी ताब्यात घेतले़ चौघांकडून अहमदाबाद येथे व्यापाºयाला कोंबड्या विक्री करुन घेतलेले १ लाख ८३ हजार ५०० रुपये व ५ लाख रुपयांचे वाहन असा सात लाख १६ हजार ६०० रुपयांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला़

ज्ञानदीप सोसायटीतून ताब्यात घेतलेल्या अमित यादव याचे दोन्ही साथीदार फरार होण्यात यशस्वी झाले आहेत़ तिघेही मध्यप्रदेशातील इंदौर येथे एकत्र येऊन महाराष्ट्र, गोवा येथे चोऱ्या करण्यासाठी येतात़ त्यांनी औरंगाबाद येथून चारचाकी चोरी करुन ते नंदुरबारात आले होते़ तिघेही तीन वेगवेगळ्या मार्गांवर बंद घर पाहून चाचपणी करत होते़ याच दरम्यान अमित यादव हा पथकांच्या हाती आला़ ही माहिती इतर दोघांना मिळाल्याने ते फरार झाल्याचा अंदाज आहे़ दरम्यान दोघेही जिल्ह्यात असावेत असा अंदाज असल्याने त्यांचा शोध सुरु आहे़