तीन शेल्टर होममध्ये १८९ स्थलांतरीतांना दिला आसरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2020 12:27 PM2020-04-07T12:27:32+5:302020-04-07T12:27:44+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा प्रशासनाने घराकडे पायी जाणाऱ्या स्थलांतरीतांच्या सोयीसाठी जिल्ह्यात नऊ ठिकाणी शेल्टर होम उभारले आहेत़ ...

Assigned to 90 migrants in three shelter homes | तीन शेल्टर होममध्ये १८९ स्थलांतरीतांना दिला आसरा

तीन शेल्टर होममध्ये १८९ स्थलांतरीतांना दिला आसरा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्हा प्रशासनाने घराकडे पायी जाणाऱ्या स्थलांतरीतांच्या सोयीसाठी जिल्ह्यात नऊ ठिकाणी शेल्टर होम उभारले आहेत़ यातील केवळ तीन ठिकाणी सध्या १८९ मजूरांची व्यवस्था करण्यात आली आहे़ या मजूरांना प्रशासन स्वयंसेवी संस्था आणि सेवाभावी व्यक्तींच्या माध्यमातून मदत देत आहे़
कोरोनामुळे लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर देशभरातील वाहतूक सेवा बंद झाली आहे़ यातून उद्योगधंदे बंद पडल्याने गुजरात राज्याच्या विविध भागातून स्थलांतरीत कामगार पायी घराकडे निघाले होते़ खान्देश, विदर्भ, मराठवाडा आणि परराज्यातील मजूरांचा समावेश होता़ अन्नपाण्याविनाच निघालेल्या या स्थलांतरीत मजूरांची व्यवस्था करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे़ यानुसार जिल्ह्यातील ९ ठिकाणी छावण्या तयार करण्यात आल्या होत्या़ गेल्या आठवड्यात यातील केवळ दोन ठिकाणी ५७ मजूर होते़ परंतु गेल्या तीन दिवसात त्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. अक्कलकुवा तालुक्यातील पेचरीदेव येथील छावणीत सर्वाधिक स्थलांतरीतांना ठेवण्यात आले आहे़ दिवसेंदिवस पायी येणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने चिंता व्यक्त होत असली तरी तहसीलदारांच्या अखत्यारित या छावण्यांचे कामकाज देऊन प्रत्येक ठिकाणी तीन ते चार महसूल कर्मचाºयांचा समावेश करण्यात आला आहे़ यात तलाठी, कोतवाल, तहसील कार्यालयातील कर्मचारी आणि तहसीलदार हे छावण्यांवर लक्ष ठेवून आहेत़ त्यांच्याकडून येथे वेळोवेळी भेटी देणे सुरु आहे़
आरोग्य विभागामार्फत दर एक दिवसाआड आरोग्य विभागाचे प्रत्येकी एक पथक पायी चालून आलेल्यांची तपासणी करत असून आरोग्य सेवकांकडून त्यांचे सर्वेक्षण करुन घेण्यावर भर देण्यात आला आहे़
लॉकडाऊनचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर या स्थलांतरीतांना त्यांच्या गावी परत पाठवण्यात येणार आहे़

नंदुरबार शहरातील नगरपालिका शाळा क्रमांक १ आणि ४, जिल्हा परिषदेची मध्यवर्ती शाळा, तळोदा शहरात प्रकल्प कार्यालयाच्या आवारातील मुलींचे वसतीगृह, खापर ता़ अक्कलकुवा येथील आदिवासी मुलींचे वसतीगृह, नवापुर शहर, सुरवाणी ता़ धडगाव येथील आदिवासी मुलांचे वसतीगृह, म्हसावद आणि प्रकाशा ता़ शहादा येथील सद्गुरु धर्मशाळा येथे स्थलांतरीत मजूरांची व्यवस्था करण्यात आली आहे़ यात अक्कलकुवा तालुक्यातील खापर येथील वसतीगृहात सर्वाधिक ८९, प्रकाशा येथे ४७ तर म्हसावद येथे १० स्थलांतरीत थांबले आहेत़ जिल्ह्यातून जाणाºया राष्ट्रीय महामार्ग आणि आंतरजिल्हा मार्गांवरुन हे मजूर घराकडे जात असताना चेकपोस्टवर त्यांच्या तपासण्या करुन त्यांना प्रशासनाकडून छावण्यांमध्ये रवाना करण्यात आले आहे़ सध्या मुक्कामी असलेले सर्वच स्थलांतरीत हे परजिल्ह्यातील रहिवासी असल्याची माहिती आहे़

खापर येथे संख्या वाढल्यानंतर स्थलांतरीतांची गैरसोय होवू नये म्हणून प्रशासनाने नवोदय विद्यालयाचे एक वसतीगृह सज्ज ठेवले आहे़
खापर येथे मोठ्या संख्येने आलेल्या नागरिकांसाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी जेवणाची सोय करुन दिली आहे़ तसेच अक्कलकुवा तालुक्यातील पाच ते सहा सेवाभावी संस्था मदतीला तयार आहेत़
स्थलांतरीतांच्या मदतीसाठी सेवाभावी नागरिकही पुढे येत असून शहादा तालुक्यातील विविध नागरिकांनी एकत्र येत प्रकाशा आणि म्हसावद येथे मदत देणे सुरु केले आहे़
तयार केलेल्या छावण्यांमध्ये मुबलक पाणी आणि वैद्यकीय सुविधा म्हणून आरोग्य पथकाच्या भेटी निश्चित करण्यात आल्या आहेत़ तसेच सकाळी चहा आणि नाश्त्याचीही सोय काही संस्थांनी करुन दिल्याचे सांगण्यात आले आहे़

Web Title: Assigned to 90 migrants in three shelter homes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.