शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदींना जिरेटोप घातल्याने वादंग; टीकेनंतर प्रफुल्ल पटेलांनी शिवप्रेमींना दिला 'हा' शब्द
2
निवडणूक प्रचारात कांद्यासाठी आंदोलनाची घोषणा; पण लंकेंनी आता शेतकऱ्यांना केलं नवं आवाहन!
3
"आमच्या घरी ईद साजरी केली जायची"; पंतप्रधान मोदींनी सांगितला मुस्लिम शेजाऱ्यांचा किस्सा
4
12वी पास कंगनाकडे कोट्यवधींचे हीरे, एकाच दिवसात खरेदी केल्या LIC च्या 50 पॉलिसी, जाणून घ्या किती आहे संपत्ती?
5
मराठमोळ्या अभिनेत्रीला झालाय गंभीर आजार, व्हिडिओ शेअर करत म्हणाली, 'मी प्रेग्नंट नाही...'
6
गंभीर हसल्याशिवाय क्रशला प्रपोज करणार नाही; तरूणीच्या पोस्टरला भारतीय दिग्गजाचं उत्तर
7
PM Modi Net Worth: कोणत्या बँकेत आहे PM नरेंद्र मोदींचं खातं, कुठे आहे गुंतवणूक? पाहा डिटेल्स
8
सत्तापिपासून भाजपा मृतदेहांवरून रॅली काढतंय का? मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून काँग्रेसचा जळजळीत सवाल
9
'लोकांचा जीव जातोय आणि हिला डान्स सुचतोय'; पाऊस पडल्यानंतर रील केल्यामुळे मन्नारा चोप्रा ट्रोल
10
'नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा नक्कीच पंतप्रधान होतील, आम्हालाही त्यांच्यासारख्या नेत्याची गरज; पाकिस्तानी अब्जाधीशांनी केले कौतुक
11
Kangana Ranaut : "तुम्ही मला एकदा मारलंत तर अनेक वेळा..."; कंगना राणौतचं विक्रमादित्य सिंहांवर टीकास्त्र
12
'अनिल कपूरसारखा पती नको' असं का म्हणाली होती माधुरी दीक्षित? इंटरेस्टिंग आहे यामागचं कारण
13
IPL Playoffsच्या २ जागांसाठी ५ संघ शर्यतीत; SRH ला ८७.३%, CSK ला ७२.७% टक्के चान्स, तर RCBला...
14
राज ठाकरेंच्या पाठिंब्यानं महायुतीला बळ; भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे 'शिवतीर्थ'वर
15
Video - ना स्ट्रेचर, ना कोणाची मदत; आजारी वडिलांना उचलून घेऊन रुग्णालयात फिरत राहिला लेक
16
सूर्यावर भीषण स्फोट; ISROच्या आदित्य L-1 आणि चांद्रयान-2 च्या कॅमेऱ्यात कैद
17
IPL मुळे भारताच्या वाट्याला T20 WC पूर्वी १ सराव सामना; दोन बॅचमध्ये संघ अमेरिकेला जाणार
18
सांगलीच्या निर्णयात घाई केली; भाजपा प्रवेशाबाबत विश्वजित कदमांचं मोठं विधान
19
SBI'ने ग्राहकांना दिली भेट! एफडीवरील व्याजदरात केली मोठी वाढ, पाहा नवे दर
20
Corona Virus : चिंताजनक! भारतात आला कोरोनाचा नवा व्हेरिएंट; 'ही' आहेत लक्षणं, लोकांसाठी किती धोकादायक?

नंदुरबारात रब्बीचे क्षेत्र यंदा निम्मेने घटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2018 12:43 PM

गहू, हरभरा क्षेत्रालाही फटका : कुपनलिका, विहिरी अटल्या, सिंचन प्रकल्पांमध्ये ठणठणाट

नंदुरबार : : पाण्याची टंचाई व दुष्काळसदृष्य स्थिती यामुळे जिल्ह्यात यंदा रब्बीची पेरणी निम्म्यावर येणार आहे. जिल्ह्यात रब्बी हंगामात सर्वाधिक गहू आणि हरभराची पेरणी केली जाते. या दोघांचे क्षेत्र देखील यंदा मोठय़ा प्रमाणावर घटणार आहे. जिल्ह्यात रब्बी व उन्हाळी पिकांचे क्षेत्र जवळपास आठशे हेक्टरच्या आसपास आहे. दरम्यान, सिंचन प्रकल्पात आतापासूनच ठणठणाट असल्यामुळे रब्बीसाठी आवर्तने यंदा सुटणार नसल्याचे चित्र आहे.जिल्ह्यात खरीप हंगाम हातचा गेला आहे. सरासरीचा केवळ 67 टक्के पाऊस झाल्याने खरीपातील पिकांची उत्पादकता निम्म्यावर   आली होती. अनेक पिके पावसाअभावी वाया गेली होती. यामुळेच शासनाने जिल्ह्यातील सर्वच खरीप आणि रब्बी गावाची पैसेवारी 50 पैशांच्या आत जाहीर करण्यात आली आहे. खरीप प्रमाणेच आता रब्बीचाही हंगाम जेमतेमच राहणार असल्याचे चित्र आहे. सद्य स्थितीत रब्बीची पेरणी आठ ते नऊ टक्केंवर झाली आहे. येत्या काळात थंडीची तीव्रता वाढणार असल्यामुळे आताच पेरणीसाठी योग्य काळ         असल्याचे कृषी विभागाचे म्हणने आहे.गहूचे क्षेत्र सर्वाधिकजिल्ह्यात रब्बी हंगामातील गहूचे क्षेत्र सर्वाधिक आहे. त्या खालोखाल हरभराचे क्षेत्र असून ज्वारीही मोठय़ा प्रमाणावर पेरली जाते. जिल्हतील एकुण रब्बीचे क्षेत्र लक्षात घेता बागायतदार शेतकरीच सर्वाधिक रब्बीची पेरणी करतात. एकुण आठशे हेक्टर क्षेत्र असून त्यात गहूचे 217.62 हेक्टर, ज्वारीचे 241.8 हेक्टर, मकाचे 15.79 हेक्टर, हरभराचे 201.53 हेक्टर, करडई 3.98, सूर्यफूल 6.14, इतर तृणधान्य 3.2, इतर कडधान्य 3.62, इतर गळीतधान्य 20.9 हेक्टर असे एकुण रब्बी हंगामाचे क्षेत्र आहे. याशिवाय उन्हाळी हंगामाचे 81.6 हेक्टर क्षेत्र आहे. त्यात भुईमूग 73.8, सूर्यफूल 2.2, मका 5.6 हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे.निम्मे क्षेत्र घटणारयंदा रब्बीचे क्षेत्र निम्मे घटणार आहे. गेल्यावर्षी पजर्न्यमान चांगले असल्यामुळे रब्बीचे क्षेत्र 100 टक्केपेक्षा अधीक झाले होते. त्यात गहूचे क्षेत्र सर्वाधिक झाले होते. यंदा मात्र, पाऊसच नसल्यामुळे आणि विहिरी, कुपनलिका यांची पाणीपातळी खोल गेल्याने पेरणी निम्मे क्षेत्रात होणार नाही.याशिवाय लघु व मध्यम सिंचन प्रकल्पात देखील ठणठणाट असल्यामुळे रब्बीसाठी पाण्याचे अवर्तने सुटण्याचा प्रश्नच राहणार नाही. त्यामुळे शेतक:यांच्या हातून यंदा रब्बी हंगाम देखील निसटला आहे.चा:याची चणचण भासणारखरीप वाया गेला, आता रब्बीही येणार नसल्यामुळे या पिकांपासून मिळणारा चाराच यंदा उपलब्ध होणार नसल्यामुळे शेतक:यांपुढे मोठी बिकट परिस्थिती राहणार आहे. त्यामुळे भर उन्हाळ्यात शेतक:यांना चा:यासाठी शोधाशोध करावी लागणार आहे. उन्हाळ्याच्या चार महिन्यांसाठी शेतक:यांना रब्बी पिकांपासून मिळणारा चारा उपयोगी पडतो. खरीप पिकांचा चारा मार्च, एप्रिलर्पयत टिकत असतो. यंदा हे चक्रच बिघडणार असल्यामुळे शेतक:यांचे अर्थकारण विस्कटणार आहे.