500 विद्युत रोहित्र सातपुडय़ात मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 12:50 PM2019-07-20T12:50:19+5:302019-07-20T12:50:26+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : तालुक्यातील शेतक:यांच्या कृषी पंपासाठी राज्य शासनाने उच्च वीज दाब योजनेंतर्गत साधारण 500 ट्रान्सफार्मर मंजूर ...

Approved of 500 Electrical Rohtak Satpudiya | 500 विद्युत रोहित्र सातपुडय़ात मंजूर

500 विद्युत रोहित्र सातपुडय़ात मंजूर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा : तालुक्यातील शेतक:यांच्या कृषी पंपासाठी राज्य शासनाने उच्च वीज दाब योजनेंतर्गत साधारण 500 ट्रान्सफार्मर मंजूर केले असून, हे ट्रान्सफार्मर उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. दरम्यान गुरूवारी रतनपाडा परिसरातील ट्रान्सफार्मरचे लोकार्पण आमदार उदेसिंग पाडवी यांच्या हस्ते करण्यात आले आहे. 
शेतक:यांसाठी स्वतंत्र ट्रान्सफार्मर बसविण्यात आल्याने आता तांत्रिक बिघाडामुळे सातत्याने खंडीत होणा:या वीजपुरवठय़ाची कटकट मिटणार आहे. त्यामुळे शेतक:यांनी शासनाच्या योजनेबाबत समाधान व्यक्त केले आहे.
एका ट्रान्सफार्मरवर साधारण 25 ते 30 शेतक:यांचे कृषी पंपाचे वीज कनेक्शन जोडलेली होती. त्यामुळे ट्रान्सफार्मरवरही क्षमतेपेक्षा अधिक वीजभार पडत होता. परिणामी या ट्रान्सफार्मरवर तांत्रिक बिघाडाचे प्रमाणदेखील मोठय़ा प्रमाणात वाढले होते. साहजिकच शेतक:यांना सातत्याने खंडित वीजपुरवठय़ाचा सामना करावा लागत होता. या पाश्र्वभूमीवर गुजरात राज्याच्या धर्तीवर आपल्या राज्यात ही शेतक:यांना कृषी पंपासाठी स्वतंत्र ट्रान्सफार्मर देण्याची मागणी केली जात होती. 
शेतक:यांची ही मागणी लक्षात घेऊन शासनाने गेल्यावर्षी कृषी पंपासाठी उच्च वीज दाब व बिरसा मुंडा योजना सुरू केली आहे. या योजनेतून येथील वीज वितरण कंपनीने जवळपास 625 शेतक:यांसाठी साधारण 25 हाऊस पावर क्षमतेच्या 500 ट्रान्सफार्मरचा साधारण दहा कोटी 20 लाख रुपयांचा प्रस्ताव पाठविला होता. शासनाने शेतक:यांची वीजेची निकड लक्षात घेऊन तातडीने प्रस्ताव मंजूर केला होता. येथील वीज वितरण कंपनीनेदेखील तत्काळ पुढील प्रक्रिया राबवून ट्रान्सफार्मरचे काम हाती घेतले आहे. त्यातील 132 ट्रान्सफार्मरचे कामही पूर्ण करण्यात आले आहे. तालुक्यातील रतनपाडा, सोरापाडा, बियामाळ, पिंपरपाडा या सातपुडय़ाचा पायथ्याशी असलेल्या गावांमधील शेतक:यांच्या डीपीचे लोकार्पण गुरूवारी आमदार उदेसिंग पाडवी यांच्या हस्ते करण्यात आले आहे. एका ट्रान्सफार्मरसाठी लावण्यात आलेल्या 10 पोलसाठी अडीच लाखाचा खर्च करण्यात आला आहे. या वेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष राजेंद्र राजपूत, नगरसेवक भास्कर मराठे, वीज वितरण कंपनीचे उपविभागीय अधिकारी सचिन काळे, सहायक अभियंता निरजकुमार, कांतीलाल पाडवी, मानसिंग पाडवी, कृष्णा सिंगा पाडवी, गोमानसिंग पाडवी, इंद्रसिंग पाडवी, विलास गुरव, अग्रवाल पावर ग्रुपचे व्ही.के. पवार आदींसह शेतकरी उपस्थित होते.
याप्रसंगी आमदार उदेसिंग पाडवी यांनी शेतक:यांना मार्गदर्शन करतांना सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार शेतक:यांच्या सुविधांसाठी नेहमीच सकारात्मक आहे. म्हणूनच त्यांनी शेतक:यांना या योजनेतून कृषी पंपाच्या विद्युत पुरवठय़ासाठी स्वतंत्र ट्रान्सफार्मर उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे आता खंडीत वीजपुरवठय़ाची कटकट निर्माण होणार नाही. सुरळीत वीजपुरवठा मिळणार असून, शेतक:यांनीही शासनाच्या या योजनेबाबत समाधान व्यक्त केले आहे. प्रास्ताविक उपविभागीय अभियंता सचिन काळे यांनी केले.
 

Web Title: Approved of 500 Electrical Rohtak Satpudiya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.