विद्युत दाहिनी बसविण्यास मंजुरी, पालिका सभा; १७ विषयांना मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:32 AM2021-05-08T04:32:04+5:302021-05-08T04:32:04+5:30

नंदुरबार : पालिकेच्या ऑनलाईन झालेल्या सर्वसाधारण सभेत एकूण १७ विषय मंजूर करण्यात आले. पालिकेच्या स्मशानभूमीत विद्युत/गॅस दाहिनी बसविण्यासह पालिकेतर्फे ...

Approval for installation of electric right, Palika Sabha; Approval of 17 subjects | विद्युत दाहिनी बसविण्यास मंजुरी, पालिका सभा; १७ विषयांना मंजुरी

विद्युत दाहिनी बसविण्यास मंजुरी, पालिका सभा; १७ विषयांना मंजुरी

Next

नंदुरबार : पालिकेच्या ऑनलाईन झालेल्या सर्वसाधारण सभेत एकूण १७ विषय मंजूर करण्यात आले. पालिकेच्या स्मशानभूमीत विद्युत/गॅस दाहिनी बसविण्यासह पालिकेतर्फे सुरू असलेल्या कोविड केअर सेंटरच्या खर्चासही मंजुरी देण्यात आली. विरोधकांनी काही विषयांवर हरकती घेत चर्चेची मागणी केली.

उपनगराध्यक्ष रवींद्र पवार यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी सकाळी पालिकेची सर्वसाधारण सभा झाली. अजेंड्यावर एकूण १७ विषय होते. ते मंजूर करण्यात आले.

सध्या कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. शिवाय जिल्हा रुग्णालय व खासगी कोविड रुग्णालयांमध्ये मृत्यू झालेल्यांवर नंदुरबारातच अंत्यसंस्कार करण्यात येतात. त्यामुळे पालिकेचा जळाऊ लाकडांवरील खर्च वाढला आहे. शिवाय पारंपरिकरीत्या दहनसाठी मृतांच्या नातेवाइकांना वाट पहावी लागते. ही बाब लक्षात घेता पालिकेतर्फे नव्याने विद्युत अथवा गॅस दाहिनी बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या कामासाठी येणाऱ्या खर्चास सभेत कार्योत्तर मंजुरी देण्यात आली. याशिवाय पालिकेतर्फे कोविड केअर सेंटर सुरू असून त्यासाठी येणाऱ्या खर्चालादेखील यावेळी मंजुरी देण्यात आली.

शहर पाणीपुरवठा योजनेअंतर्गत नवीन व्हॅाल्व बसविण्याच्या कामाचे २४ लाख ९८ हजार ४५५ रुपयांचे अंदाजपत्रक मंजूर करण्यात आले. सिटी पार्क परिसर व इतर भागात नवीन जलवितरण व्यवस्थेसाठी पाईपलाईन टाकण्याच्या ४२ लाख २३ हजार ५५७ रुपये खर्चाच्या अंदाजपत्रकासही मंजुरी देण्यात आली. पथदिवे देखभाल दुरुस्तीच्या ठेक्याची मुदत संपत आल्याने त्याला मुदतवाढ देण्यास मंजुरी देण्यात आली.

१४ व्या वित्त आयोगाअंतर्गत कृष्णानगरमधील अंतर्गत रस्ते खडीकरण व डांबरीकरण कामाचे ३८ लाख नऊ हजार, तर हाजी अब्दुल रज्जाकपार्कमधील रस्ते कामांच्या ४७ लाख ८३ हजार रुपयांच्या अंदाजपत्रकास मंजुरी देण्यात आली.

याशिवाय इतरही विविध विषयांवर चर्चा होऊन निर्णय घेण्यात आला.

Web Title: Approval for installation of electric right, Palika Sabha; Approval of 17 subjects

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.