भरड धान्य खरेदी केंद्राला मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2019 12:08 PM2019-11-21T12:08:57+5:302019-11-21T12:09:02+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : खरीप, रब्बी  हंगामात पणन विभागातर्फे विकेंद्रित खरेदी योजनेअंतर्गत शेतकरी सहकारी संघाला भरडधान्य खरेदी केंद्रांना ...

Approval for bulk grain purchase center | भरड धान्य खरेदी केंद्राला मंजुरी

भरड धान्य खरेदी केंद्राला मंजुरी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : खरीप, रब्बी  हंगामात पणन विभागातर्फे विकेंद्रित खरेदी योजनेअंतर्गत शेतकरी सहकारी संघाला भरडधान्य खरेदी केंद्रांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यासाठी आधारभूत किंमती निश्चित करण्यात आल्या असून, शासकीय गोदामात खरेदीला लवकरच सुरुवात होणार आहे.
किमान आधारभूत किंमत खरेदी योजना ही केंद्र शासनाची आहे. शेतक:यांना हमीभावापेक्षा कमी किमतीने धान्य विकावे लागू नये म्हणून अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडून योजना राबविण्यात येत आहे. बिगर आदिवासी क्षेत्रात महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन, मुंबई व आदिवासी क्षेत्रात राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ, नाशिक या अभिकत्र्या संस्थांमार्फत एफएक्यू दर्जाच्या धान व भरड धान्याची खरेदी करण्यात येत असते.
दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन धुळे व नंदुरबार येथील मार्केटिंग अधिका:यांनी नुकतेच शेतकरी सहकारी संघाला पत्र पाठवून शासकीय गोदामाच्या ठिकाणी खरेदी केंद्र सुरू करण्याचे अवगत केले आहे. खरेदीची पूर्ण प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने करण्यात येणार आहे. 
ज्वारी हायब्रीड 2 हजार 550 रुपये, ज्वारी मालदांडी 2 हजार 570, मका 1 हजार 760, बाजरी 2 हजार रुपये प्रतिक्विंटल आधारभूत किमती निश्चित करण्यात आलेल्या   आहेत.
शेतक:यांनी योजनेच्या लाभ घेण्यासाठी शेतकरी सहकारी संघाच्या कार्यालयात मूळ 7/12 उतारा, बँकेचे पासबुक ङोरॉक्स, आधार कार्ड ङोरॉक्स व मोबाईल नंबर देऊन ऑनलाईन नोंदणी करावी. भरडधान्य कोरडा, स्वच्छ व एफएक्यू दर्जाच्या माल विक्रीसाठी आणावा. ज्वारी, मका, बाजरी यांची आद्रता प्रमाण 14 टक्के असावे. 
ऑनलाईन नोंदणी शिवाय मालाची विक्री करता येणार नाही. 31 डिसेंबर पयर्ंत खरेदीचा कालावधी आहे. योजनेच्या जास्तीत जास्त शेतक:यांनी लाभ घ्यावा असे आवाहन शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष बी.के.पाटील यांनी केले आहे.
 

Web Title: Approval for bulk grain purchase center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.