लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : पी़क़ेअण्णा पाटील फाउंडेशनतर्फे देण्यात येणा:या पुरुषोत्तम पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आह़े मनोरुग्णांसाठी काम करणा:या श्रद्धा रिहॅबिलीटेशन फाउंडेशन आणि सहकार भारतीचे संस्थापक सदस्य सतीश मराठे हे यंदाच्या पुरस्कारांचे मानकरी आहेत़ पी़क़ेअण्णा पाटील यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक, शैक्षणिक आणि संशोधन क्षेत्रात काम करणा:या राज्यातील व्यक्ती आणि संस्थेला पी़क़ेअण्णा पाटील फाउंडेशनतर्फे दरवर्षी पुरुषोत्तम पुरस्कार देण्यात येतात़ 2002 पासून विविध क्षेत्रातील मान्यवर आणि संस्थांना हे पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत़ 1 लाख रुपये रोख व मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आह़े 2019 या वर्षासाठी वेणगाव, कजर्त जि़ रायगड येथील श्रद्धा रिहॅबिलीटेशन फाउंडेशन या संस्थेला पुरस्कार देण्यात येणार आह़े 1991 पासून धर्मदाय संस्था म्हणून मान्यता असलेल्या या संस्थेकडून रस्त्यावर फिरणा:या मनोरुग्णांवर उपचार केले जातात़ आजवर संस्थेने सात हजार मनोरुग्ण बरे करुन देशभरातील त्यांच्या कुटूंबियांकडे पोहोचते केले आहेत़ त्यांच्या या कार्याची दखल घेत हा पुरस्कार देण्यात येणार आह़े व्यक्तीस्तरावरील सहकार भारतीचे संस्थापक सदस्य तथा रिझर्व बँक ऑफ इंडिया आणि राष्ट्रीय सहकारी विकास निगमचे संचालक सतीश मराठे यांना जाहिर झाला आह़े सहकार क्षेत्रातील त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना पुरस्कार देण्यात येणार असल्याची माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष दिपक पाटील व सचिव प्राचार्य मकरंद पाटील यांनी दिली आह़े पुरस्कारांचे वितरण 9 ऑक्टोबर रोजी सकाळी 9़30 वाजता शहादा येथील पूज्य सानेगुरुजी विद्याप्रसारक मंडळांच्या प्रांगणात होईल़
पुरुषोत्तम पुरस्कारांची घोषणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 13:10 IST