लोकमत न्यूज नेटवर्कअक्कलकुवा/शहादा : अक्कलकुवा येथील तीन जण तर शहादा येथील एकजण असे एकुण चार जण शनिवारी कोरोनामुक्त झाले. या सर्वांना सायंकाळी जिल्हा रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. अक्कलकुव्यातील तिन्ही महिला आहेत. तर शहाद्यातील एक पुरुष आहे.अक्कलकुवा येथील चार जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. त्या सर्वांवर जिल्हा रुग्णालयातील आयशोलेशन कक्षात उपचार सुरू होते. त्यापैकी तिघांचे सलग दोन अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना रुग्णालातून सुट्टी देण्यात आली. यात तिन्ही महिला असून एक २३, दुसरी ३२ तर तिसरी ४८ वर्षीय महिला आहे. आता अक्कलकुवा येथील केवळ एक महिला जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहे.जवाहर नवोदय विद्यालयातील कोरोना-१९ साठी तयार करण्यात आलेल्या विलगीकरण कक्षातील १६ जणांचा स्वॅब तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर स्वप्नील मालखेडे यांनीही त्याला दुजोरा दिला.अक्कलकुवा शहरातील चार पैकी एक रुग्ण कोरोनामुक्त झाला आहे. त्यांना शनिवारी सायंकाळी उशीरा रुग्णालयातून सूट्टी देण्यात आली. जवाहर नवोदय विद्यालय याठिकाणी तयार करण्यात आलेल्या विलगीकरण कक्षात शहरातील कोरोनारुग्णाच्या संपर्कात आलेल्या १६ जणांचे विलगीकरण करण्यात आले होते या या सर्व १६ जणांचे स्वॅब तपासणी अहवाल प्राप्त झाला असून सर्वांचे अहवाल निगेटिव आले आहेत. या दिलासादायक बातमीमुळे तालुका आरोग्य विभागासह तालुका प्रशासनाने काहीसा सुटकेचा निश्वास सोडला आहे. गेल्या पंधरवड्यापासून या रुग्णांवर उपचार सुरू होते. या विलगीकरण कक्षाचे प्रमुख वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर गणेश पवार सह त्यांच्या आरोग्य पथकातील कर्मचाऱ्यांनी या रुग्णांवर उपचार केले. शहरातील १६ जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने शहरवासीयांना या बातमीने सध्यातरी दिलासा मिळाला आहे.शहाद्यातही दिलासा...शहादा येथील नागरिकांना देखील दिलासादायक बातमी सायंकाळी आली. शहाद्यातील पहिल्या कोरोना रुग्णाच्या कुटूंबतील २३ वर्षीय पुरूष रुग्णाचे सलग दोन अहवाल देखील निगेटिव्ह आले असल्याने त्यालाही रुग्णालयातून घरी जावू देण्यात आले.यामुळे आता शहाद्यातील दोन रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. येथील एकुण ९ जण कोरोनाग्रस्त होते त्यातील दोनजण कोरोनामुक्त झाले आहेत. तर एकाचा मृत्यू झाला होता. आता सहा जणांवर उपचार सुरू आहेत.शनिवारी सायंकाळी चार रुग्ण कोरोनामुक्त झाल्याची बाब समोर आल्यानंतर समाधान व्यक्त झाले.
अक्कलकुवा तीन, शहाद्यात एक कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2020 11:57 IST