शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्याचा हल्ल्यात बालकाचा मृत्युनंतर देवमोगरा परिसरातील नागरिक भयभीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2023 19:34 IST

अक्कलकुवा तालुक्यातील देव मोगरा पुनर्वसन शिवारात गेल्या दोन दिवसापूर्वी अचानकपणे बिबट्याने हल्ला करून एका बालकाला ठार केले

रमाकांत पाटील/नंदुरबार :  अक्कलकुवा तालुक्यातील देवमोगरा पुनर्वसन शिवारात बिबट्यांच्या मुक्त संचार सुरूच असून काल मध्यरात्री नंतर शेतात पाणी भरणाऱ्या दोन शेतकऱ्यांना पळवून लावल्याची घटना घडल्याने या परिसरात देखील पिंजरा लावण्याची मागणी केली आहे.

अक्कलकुवा तालुक्यातील देव मोगरा पुनर्वसन शिवारात गेल्या दोन दिवसापूर्वी अचानकपणे बिबट्याने हल्ला करून एका बालकाला ठार केले असल्याची घटना घडली होती. या शिवारात दिनांक सहा एप्रिल रोजी रात्री दोन वाजेच्या सुमारास देवमोगरा पुनर्वसन येथील आपल्या शेतात सायसिंग वसावे व त्याच्या भाऊ सामानसिंग वसावे हे दोन्ही आपल्या शेतातील तिळीच्या शेतात पाणी भरण्यासाठी गेले असता अचानकपणे त्यांचा सामना दोन बिबट्यांशी झाला. बिबटे त्यांच्या पाठलाग करीत होते मात्र त्यांनी आरडाओरडा करत जीव मुठीत धरून तेथून पळ काढत आपली कशीबशी सुटका केली. या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून रात्री फिरणाऱ्या या बिबट्यांपासून संरक्षणासाठी वन विभागातील कर्मचाऱ्यांनी गस्त घालण्याची मागणी केली जात असून या बिबट्यांना पकडण्यासाठी या परिसरात पिंजरा लावण्याची मागणी केली आहे.

चौकट या परिसरातील मक्याच्या शेतात बिबट्याने अनेक कुत्र्यांना फस्त केले असून त्यांचे अवशेष जवळील मक्याच्या शेतात आढळून आले आहेत. या परिसरात शेतीसाठी रात्री विद्युत पुरवठा सुरळीत होत असल्याने शेतकरी आपल्या पिकांना पाणी देण्यासाठी जीव मुठीत धरून पाणी देण्यासाठी जीव धोक्यात घालत आहेत. या शेतकऱ्यांना दिवसा सुरळीत  वीजपुरवठा झाल्यास हा धोका टळू शकतो याबाबतही प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी शेतकऱ्यांनी  केली आहे.

टॅग्स :leopardबिबट्याnandurbar-pcनंदुरबार