बिबट्याच्या संचाराची नागरीकांमध्ये भीती
तळोदा : शहरालगतच्या परिसरात बिबट्याचा संचार पुन्हा सुरु झाला आहे. यामुळे नागरीकांमध्ये भीती आहे. आमलाड रस्ता व परिसरात बिबट्याचा संचार असल्याची माहिती देण्यात आली आहे. या भागात बिबट्या रस्त्यालगत हिंडत असल्याचा व्हिडिओही व्हायरल झाला होता. गेल्या दोन वर्षांपासून या भागात बिबट्याचा संचार सुरु आहे. वनविभागाकडून कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यात येत नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. वनविभागाने या भागात पिंजरे लावण्याची मागणी करण्यात आली आहे.
पोलीसांची गस्त सुरु झाल्याने समाधान
नंदुरबार : शहरालगतच्या होळ तर्फे हवेली शिवारात पोलीसांची गस्त सुरु झाली आहे. यामुळे नागरीकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. गुरुकुल नगर तसेस जगतापवाडी भागात रात्री पोलीसांची गस्त सुरु झाली आहे. या भागात चोरीचे प्रकार वाढल्याने चिंता वाढल्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून या भागात चोऱ्यांचे प्रमाण वाढले होते. काही ठिकाणी भुरट्या चोऱ्याही झाल्या होत्या. यामुळे पोलीसांची गस्त सुरु व्हावी अशी मागणी होत होती.