शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
2
Top Marathi News Live: ही माझी शेवटची सभा, आता ४ मे नंतर शपथविधी सोहळ्याला येईन: PM मोदी
3
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर ४८% नं वधारला; ३० रुपयांच्या वर पोहोचला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
4
३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम...
5
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
6
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
7
'चला हवा येऊ द्या'च्या दुसऱ्या सीझनमध्ये परत तीच टीम का नव्हती? श्रेया बुगडे म्हणाली...
8
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
9
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
10
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
11
Ilma Afroz : वडिलांचं छत्र हरपलं, शेतात घाम गाळला; आईने पणाला लावलं आयुष्य, लेक झाली IPS अधिकारी
12
"आज सासऱ्यांना मिस करतेय, रिंकूची खेळी त्यांच्यासाठी होती"; KKR जिंकल्यावर प्रिया सरोज भावूक
13
बर्थडे पार्टीत रक्ताचा सडा! चेहऱ्याला केक लावल्याच्या रागातून भाजप नेत्याच्या भावांसह तिघांची हत्या
14
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
15
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
16
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
17
Samudrik Shastra: सामुद्रिक शास्त्रानुसार हसण्याच्या पद्धतीवरून ओळखता येतात माणसाचे गुण-दोष!
18
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
19
Video - हृदयद्रावक! जन्मदात्या आईचा क्रूरपणा; १८ महिन्यांच्या लेकीला फेकलं नाल्यात अन्...
Daily Top 2Weekly Top 5

स्वतंत्र कोविड कक्षासाठी प्रशासनाचे प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2020 12:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने जाहीर केलेल्या लॉक डाऊनच्या दुसऱ्या दिवशी शहरासह तालुक्यातील लोणखेडा, ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने जाहीर केलेल्या लॉक डाऊनच्या दुसऱ्या दिवशी शहरासह तालुक्यातील लोणखेडा, तोरखेडा, दामळदा, म्हसावद व डामरखेडा या गावांमध्ये सर्व व्यवहार बंद ठेवत नागरिकांनी समर्थन दिले. प्रशासनातर्फे बाधीत रूग्णांच्या संपर्कातील नागरिकांची माहिती जाणून घेतली जात असून संशयितांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात येत आहे. शहादा येथे स्वतंत्र कोविड कक्ष सुरू करण्याचे प्रयत्न प्रशासनातर्फे करण्यात येत असल्याची माहिती प्रांताधिकारी डॉ.चेतन गिरासे यांनी दिली.३ जुलैला शहरात आठ व ५ जुलैला तालुक्यातील तोरखेडा येथे पाच असे सलग १३ कोरोना विषाणू बाधीत रुग्ण आढळून आल्याने प्रशासन हायअलर्टवर आहे. वाढत्या रूग्णसंख्येला आळा घालण्यासाठी प्रशासनातर्फे ८ जुलैपर्यंत शहादा व लोणखेडा या गावात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. प्रतिबंध क्षेत्रातील भागात निर्जंतुकीकरण करण्यासह रहिवाशांची वैद्यकीय पथकामार्फत आरोग्य तपासणी केली जात आहे. बाधीत रुग्णांची प्रवास व इतर माहिती जाणून घेतली जात असून अतिसंपर्कातील व्यक्तींची विलगीकरण कक्षात रवानगी केली जात आहे. तर संपर्कातील व्यक्तींना घरी राहण्याचा सल्ला आरोग्य विभागामार्फत दिला जात आहे.तालुक्यातील हिंगणी, बामखेडा व तोरखेडा या भागात कोरोना विषाणू बाधीत रुग्ण आढळून आले आहेत. विशेषत: तोरखेडा येथील रुग्णांची वाढती संख्या ही चिंतेची बाब झाली आहे. हा संपूर्ण भाग धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुकानजीक असल्याने व शिरपूर हे कोरोनाचे हॉटस्पॉट ठरत असल्याने या संपूर्ण परिसरात विशेष काळजी प्रशासनाने घ्यायला हवी. विशेषत: शहादा तालुक्यातील अनेक नागरिक व्यवसाय व कामानिमित्त शिरपूर येथे जातात. बाधीत रुग्णांची प्रवास हिस्ट्री ही शिरपूर असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. परिणामी आंतरजिल्हा प्रवासाला परवानगीशिवाय बंदी असतानाही या परिसरातील नागरिक शिरपूर येथे पोहोचतात कसे व शिरपूर येथील नागरिक शहादा तालुक्यात येतात कसे? याबाबत प्रशासनाने विशेष चौकशी करण्याची गरज आहे.सारंगखेडा पोलिसांचे शहादा हद्द समाप्तीवर तपासणी पथक आहे. असे असतानाही शहादा-शिरपूर प्रवास कसा काय सुरु आहे याची चौकशी होणे आवश्यक असल्याचे मत अनेक नागरिकांनी व्यक्त केले आहे.शहरासह तालुक्यातील अनेक भागात कोरोना विषाणू संक्रमणाचे लक्षणे दिसून येत नसली तरी बाधीत रुग्णांबाबतचा अहवाल मिळाल्यानंतर त्याच्या संपर्कातील नातेवाईक व नागरिकांचा कोरोना विषाणू अहवाल पॉझिटीव्ह येत असल्याने शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. प्रशासनातर्फे बाधीत रुग्ण आढळून आल्यानंतर त्या भागातील रुग्णाच्या अतिसंपर्कातील व्यक्तींना मोहिदा येथील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात येऊन तेथे त्यांच्या घशातील स्वॅबचे नमुने तपासणीसाठी घेतले जात आहेत. या नमुन्यांचा अहवाल प्राप्त होत नाही तोपर्यंत अशा नागरिकांना विलगीकरण कक्षातच ठेवले जात होते. मात्र ज्या नागरिकांना कोरोनाची कुठलीही लक्षणे आढळत नाही परंतु यातील काहींचा अहवाल पॉझिटीव्ह येत असल्याने अशा नागरिकांना व लक्षणे आढळून येत नसलेल्या रुग्णांसाठी लवकरच शहादा येथे स्वतंत्र इमारतीत आयसोलेशन वार्ड कार्यान्वित करण्याबाबत प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती प्रांताधिकारी डॉ.चेतन गिरासे यांनी दिली.दरम्यान, सोमवारी पाच जणांच्या स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून ३६ जणांना मोहिदा रस्त्यावरील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.गणेशनगर येथील दोन बाधीत बाधित रुग्णांचा उपचाराचा अंतिम अहवाल आल्यानंतर त्यांना जिल्हा रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले आहे.जिल्हा रुग्णालयात शहरासह तालुक्यातील १४ बाधितांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.आजआखेर शहरासह तालुक्यातील ५४ जणांचा अहवाल अपेक्षित आहे.तोरखेडा, दामळदा व डामरखेडा गाव चार दिवस बंद करण्याचा निर्णय ग्रामपंचायतींनी घेतला आहे.तोरखेडा येथील बाधीत पाच रुग्ण १० दिवसापासून मोहिदा रस्त्यावरील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले होते. त्यांचा अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.