नंदुरबारातील चार हॅाटेलवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:32 AM2021-05-08T04:32:17+5:302021-05-08T04:32:17+5:30

नंदुरबार : संचारबंदीत हॅाटेल व्यवसाय बंद ठेवण्याचे निर्देश असतानाही शहरातील निझर रोडवरील चार हॅाटेल बिनदिक्कत सुरू असल्यामुळे पोलिसांनी धडक ...

Action on four hotels in Nandurbar | नंदुरबारातील चार हॅाटेलवर कारवाई

नंदुरबारातील चार हॅाटेलवर कारवाई

Next

नंदुरबार : संचारबंदीत हॅाटेल व्यवसाय बंद ठेवण्याचे निर्देश असतानाही शहरातील निझर रोडवरील चार हॅाटेल बिनदिक्कत सुरू असल्यामुळे पोलिसांनी धडक कारवाई केली. संबंधित हॅाटेलचालकांवर कारवाई करण्यात आली.

जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे हॅाटेल व्यवसायावर मर्यादा आल्या आहेत. सकाळी सहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत नियमांचे पालन करून सुरू ठेवण्यात येत आहेत. काही जणांना पार्सलची सुविधेसाठी परवानगी देण्यात आली आहे. परंतु, निझर रस्त्यावरील काही हॅाटेलला कुठलीही परवानगी नसताना रात्री उशिरापर्यंत ते सुरू होते. त्यात हॅाटेल मंदाकिनी, हॅाटेल व्ही.टी.पॅलेस, हॅाटेल साई पॅलेस, हॅाटेल भाऊ का ढाबा यांचा समावेश होता. उपनगर पोलिसांनी रात्री या भागात अचानक धाडसत्र राबविले. त्यावेळी या हॅाटेलमध्ये ग्राहक असल्याचे दिसून आले. त्यामुळे पथकाने त्यांच्यावर कारवाई केली. पालिकेला कळवून संबंधित हॅाटेल सील करण्यात आले. हॅाटेल व बारवर प्रथमच कारवाई करण्यात आली.

कारवाई करण्यात आलेल्यांमध्ये हॅाटेल मंदाकिनीचे मॅनेजर सुरज सुधाकर मराठे, हॅाटेल व्ही.टी.पॅलेसचे मॅनेजर किशोर सुकदेव पाटील, हॅाटेल साई पॅलेसचे मॅनेजर मुकेश मच्छिंद्र चौधरी, हॅाटेल भाऊ का ढाबा चे मॅनेजर चंद्रशेखर तुमडू चौधरी यांच्यावर उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर अधीक्षक विजय पवार, उपअधीक्षक सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनगरचे प्रभारी अधिकारी अर्जुन पटले, उपनिरीक्षक प्रशांत राठोड, यादव भदाणे, देवीदास सोनवणे, हवालदार रवींद्र शिरसाठ, सुनील येलवे, विलास वसावे, धरमसिंग वसावे, ज्ञानेश्वरी घुगे, सतीश ढोले व राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपनिरीक्षक शैलेंद्र मराठे व त्यांच्या पथकाने केली.

या कारवाईमुळे मात्र, हॅाटेलचालकांचे धाबे दणाणले आहेत. अनेक भागात रात्री उशिरापर्यंत हॅाटेल चालविले जात असून त्यातून मद्याची मोठ्या प्रमाणावर विक्री होत असल्याचे बोलले जात आहे.

Web Title: Action on four hotels in Nandurbar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.