लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या एकाविरोधात धडगाव येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. भाईदास वेस्ता पावरा असे गुन्हा झालेल्या मद्यपी दुचाकीस्वाराचे नाव आहे. भाईदास हा सोमवारी सायंकाळी शेलकुईचा कुंभारीपाडा गावाकडे जात असताना मद्यपान केलेल्या अवस्थेत एमएच ३९ एएफ ७५९९ ही दुचाकी चालवत असल्याचे दिसून आले होते. शहरातील जुने तहसील कार्यालयासमोर हा प्रकार घडला. पोलीस पथकाने तातडीने त्याला थांबवत चाैकशी करून कारवाई केली. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल विनोद पाटील यांनी धडगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून भाईदास पावरा याच्याविरोधात गुन्हा दाखल आहे.
मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यावर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 12:57 IST