लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात 12 वर्षापासून फरार आरोपीला पोलीस पथकाने रेल्वे स्थानक परिसरातून ताब्यात घेतल़े मंगळवारी सकाळी 11 वाजता ही कारवाई करण्यात आली़ नरेंद्रभाई रमेशभाई पाटील रा़ सुरेंद्रनगर हा शहर पोलीस ठाणे हद्दीत चोरीचा गुन्हा करुन 12 वर्षापासून फरार होता़ दरम्यान नरेंद्रभाई हा मंगळवारी नंदुरबार येथे रेल्वेने येणार असल्याची माहिती पोलीसांनी मिळाली होती़ त्यानुसार पोलीस निरीक्षक सुनील नंदवाळकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस हेड कॉन्स्टेबल रविंद्र कुवर, जितेंद्र पाडवी, शैलेंद्र माळी, गोकूळ बंजारा, रामा वळवी यांनी सापळा रचून त्यास ताब्यात घेतल़े पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत यांनी पथकाचे कौतूक केले आह़े
गुन्ह्यातील फरार आरोपीस रेल्वेस्थानक परिसरातून अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2019 12:53 IST