शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा ट्विस्ट...! 'ॲक्सिस माय इंडिया'कडून पश्चिम बंगालचा एक्झिट पोल जाहीर करण्यास नकार, अंदाजच येईना...
2
सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड...
3
'राजा शिवाजी'तील वाघनखं, चंद्रकोर, पेहेरावावरून सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा! पण रितेशने 'या' गोष्टींमध्ये बाजी मारली...
4
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
5
"एकनाथ शिंदेंनी हुल दिली अन् उद्धव ठाकरे..."; विधान परिषदेवरुन ज्योती वाघमारेंनी उडवली खिल्ली
6
MI vs SRH: मुंबई इंडियन्सच्या लाजिरवाण्या पराभवानंतर नीता अंबानी, आकाश अंबानींचा चेहराच पडला
7
ज्या बॉलरचं नाव ऐकून भल्याभल्यांना फुटतो घाम, त्यालाच मारला 'नो लूक सिक्स'; सलील आरोराचा व्हिडीओ व्हायरल?
8
“सॉरी जिया... मम्माला मरावंच लागेल”, महिलेची आत्महत्या; स्मशानभूमीत आला धडकी भरवणारा Video कॉल
9
Bank Holidays in May: मे महिन्यात १३ दिवस बँका राहणार बंद; कोणत्या राज्यात केव्हा असेल सुट्टी?
10
बागेत प्रियकरासोबत रोमान्स करत होती २ मुलांची आई, गावकऱ्यांनी दोघांना पाहिलं अन् पुढे असं काही केलं...
11
Buddha Purnima 2026 Wishes: बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा बुद्ध जयंती!
12
तिढा सुटला, विधान परिषद निवडणुकीतून काँग्रेसची माघार, अंबादास दानवे असतील मविआचे उमेदवार
13
महायुती-महाविकास आघाडीचे ठरले; पाहा, विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी संपूर्ण उमेदवारांची यादी
14
Vastu Shastra: प्रगतीचे मार्ग मोकळे करायचे आहेत? मग तुमच्या घरातील 'हे' वास्तू दोष त्वरित दूर करा!
15
पश्चिम बंगालमध्ये भल्या भल्यांना कोडे सुटेना! ५१ लाख मतदार घटले तरी ३० लाख मते वाढली; ९३% मतदानाचा रेकॉर्ड कोणाचे टेन्शन वाढवणार?
16
"माझ्यावर हसतोय?" कुर्ल्यात तरुणावर चाकूनं सपासप वार, भररस्त्यात घडलेल्या घटनेनं खळबळ!
17
पुतिन-ट्रम्प यांची फोनवर चर्चा; युरेनियम रशियाला देण्याची ऑफर अमेरिकेने नाकारली! इराणचं टेन्शन वाढलं
18
अमेरिकेने भारताला परत केल्या ६५७ प्राचीन मूर्ती, अमूल्य ठेव्याची एवढी आहे किंमत 
19
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! उद्या शेअर बाजारात कामकाज होणार का? ट्रेडिंगपूर्वी चेक करा नवं हॉलिडे कॅलेंडर
20
रियान परागला मोठा धक्का! ड्रेसिंग रूममध्ये स्मोकिंग केल्याप्रकरणी BCCIने केली कठोर कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

दुर्घटना टळली, पण प्रशासन मात्र निद्रीस्तच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2020 11:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : यंदाच्या पावसळ्यातच नदीला आलेल्या अचानक पुरामुळे ज्या ठिकाणी सहा जण वाहून गेले होते, सुदैवाने ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : यंदाच्या पावसळ्यातच नदीला आलेल्या अचानक पुरामुळे ज्या ठिकाणी सहा जण वाहून गेले होते, सुदैवाने त्यांना वाचवण्यात यश आले. अशा राजापूर येथील शिवण नदीवरील फरशी पुलाची उंची वाढविण्याबाबत यंदाही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने परिसरातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे याच नदीवर इतर पुलांची उंची वाढविली जात असतानां याकडेच दुर्लक्ष केल्याने नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.नंदुरबार तालुक्यातून वाहणाऱ्या शिवण नदीला पावसाळ्याच्या कालावधीत मोठे पूर येतात. या पुरांमुळे नंदुरबार व नवापूर तालुक्यातील नागरिकांच्या अडचणी वाढतात, काही प्रमाणात जनजीवनच विस्कळीत होते. जिल्ह्याचे तथा बाजारपेठेचेही मुख्य ठिकाण असलेल्या नंदुरबारचा संपर्क तुटतो. अशी अडचण येऊ नये यासाठी शिवण नदीवर येणाºया सर्व पुलांची आवश्यकतेनुसार उंची अधिक ठेवण्यात आली आहे. परंतु पुलाची उंची तथा विकासाबाबत राजापूर येथील पुलाकडे शासन यंत्रणेने सपशेल दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. हा पुल सर्वाधिक गावांना सोयीचा ठरत असतांनाही या पुलाची उंची सर्वात कमी ठेवण्यात आली असल्याने राजापूरसह शेजाारील गावांमधील नागरिकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.शिवण नदीवर सुंदरदे, बद्रीझिरा, भवाली, धुळवद येथे दोन व व्याहूर येथे एकुण सहा पूल आहेत. त्या सर्व पुलांची आवश्यतेनुसार उंची ठेवण्यात आली आहे. त्यातून राजापूरचा पूल सुटला आहे. या पुलाचीही उंची वाढविण्यासाठी ग्रामपंचायतीने पाठपुरावा केला, परंतु त्याची दखल घेतली गेली नाही.४शिवण नदीवर बांधण्यात आलेल्या विरचक धरणातील पाणी पातळी वाढल्याच काठावरील नागरिकांना कुठलीही पूर्वसूचना न देता पाणी सोडले जात होते, त्यामुळे अनेक जण अडचणीत आले होते. अशी अडचण निर्माण होऊ नये, यासाठी केलेल्या पाठपुराव्याचीच दखल घेत सुचना केल्या गेल्या.लोकसभा व विधानसभेपाठोपाठ जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीत राजापूरसह शेजारिल गावातील मतदारांनी भाजपाला भरीव मदत केल्याचे आढळून येते. तसे विधानसभा मतदार क्षेत्रासह गट व गणातही भाजपाच्या उमेदवारालाच प्रतिनिधीत्वाची संधी दिली आहे. एवढेच नव्हे तर जिल्हा परिषदेतही भाजपाला संधी मिळाली आहे. त्यामुळे भाजपाच्या लोकप्रतिनिधींकडून या भागातील नागरिकांच्या नवीन पुल निर्मितीबाबत अपेक्षा वाढल्या आहे.पुलाची उंची वाढविणे तथा नवीन पुलाबाबत नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य राजश्री गावीत यांच्याकडे पाठपुरावा केला असता त्यांनी या कामासाठी निधी मिळवून देण्यास प्रयत्नशिल असल्याचे सांगितले, त्यामुळे त्यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधींकडूनही नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या आहे.