शहाद्यातील भर वस्तीतील रुग्णालयात बिबट्या शिरल्याने खळबळ

By रमाकांत.फकीरा.पाटील | Published: December 12, 2023 11:06 AM2023-12-12T11:06:36+5:302023-12-12T11:07:17+5:30

रुग्णालयातील कर्मचारी व शेजाऱ्यांनी लागलीच मागच्या बाजूचा दरवाजा बंद केल्याने बिबट्याला एका ठिकाणी अडकविण्यात यश आले.

A leopard entered the hospital in Shahada's at Nandurbar | शहाद्यातील भर वस्तीतील रुग्णालयात बिबट्या शिरल्याने खळबळ

शहाद्यातील भर वस्तीतील रुग्णालयात बिबट्या शिरल्याने खळबळ

नंदुरबार:   शहादा शहरातील डोंगरगाव रस्त्यावरील भर वसाहतीतील आदित्य हॉस्पिटल मध्ये बिबट्या शिरला आहे.ही माहिती मिळताच परिसरात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती रात्रीच्या सुमारास हा बिबट्या हॉस्पिटलमध्ये शिरला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे घटनास्थळी वन विभागाची टीम दाखल झाली असून त्याला जेरबंद करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहे

शहरातील डोंगरावर रस्ता हा डॉक्टर हब म्हणून प्रसिद्ध आहे येथे सर्व प्रकारचे रुग्णालय असल्याने रात्रंदिवस मोठ्या प्रमाणात गर्दी असते आज सकाळपासून परिसरात दैनंदिन व्यवहार सुरू असताना रुग्णालयाचे साफसफाई करणाऱ्या कर्मचाऱ्याला वाहन चालकाला रुग्णालयाच्या मागील बाजूच्या कोपऱ्यातून गुरगुरल्यासारखा आवाज आला त्याने याबाबत डॉक्टर विवेक पाटील यांना माहिती दिल्यानंतर डॉक्टरांनी त्यांच्या शेजारी राहणारे सागर चौधरी यांना कळविले.

रुग्णालयातील कर्मचारी व शेजाऱ्यांनी लागलीच मागच्या बाजूचा दरवाजा बंद केल्याने बिबट्याला एका ठिकाणी अडकविण्यात यश आले. त्यानंतर तात्काळ वन विभागाशी संपर्क साधल्यानंतर सुमारे दहा वाजेच्या सुमारास वनविभागाचे पथक घटनास्थळी आवश्यक त्या साधनसामग्रीसह दाखल झाले गेल्या अर्ध्या तासापासून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत परिसरात बिबट्या शिरल्याची माहिती मिळाल्यानंतर बिबट्याला बघण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती
सदर बिबट्या रुग्णालयात कसा शिरला तो कधी आला याबाबत अनेक तर्क वितर्क लावले जात आहे

Web Title: A leopard entered the hospital in Shahada's at Nandurbar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.