लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहरातील हुडको कॉलनीतील घरातून 87 हजार 500 रुपयांचे दागिने चोरीला गेल्याची घटना 13 जुलै रोजी उघडकीस आली़ याप्रकरणी मोलकरीणीवर संशय व्यक्त करत गुन्हा दाखल झाला आह़े वैभव दौलतराव थोरात यांच्या हुडको कॉलनीतील घरातील कपाटातील ड्रॉवरमधून 24 जून ते 13 जुलै यादरम्यान लक्ष्मीबाई हरदास या महिलेने 2़5 तोळे सोन्याची मंगलपोत आणि 2 सोन्याच्या अंगठय़ा अशा 87 हजार 500 रुपये किमतीचा ऐवज चोरुन नेला होता़ घरमालक थोरात यांना 13 जुलै रोजी घरातील कपाटात ठेवलेले दागिने आढळून न आल्याने त्यांनी उपनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली़ याबाबत वैभव थोरात यांच्या फिर्यादीवरुन मोलकरीण लक्ष्मीबाई हरदास रा़ वाघोदा हिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल वसावे करत आहेत़ घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून पोलीसांकडून संशयित महिलेची चौकशी सुरु असल्याची माहिती देण्यात आली आह़े
हुडको कॉलनीतून 87 हजारांचे दागिने लांबवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 12:32 IST