शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

66 ग्रा.पं.चा निवडणुकांची रणधुमाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 12:40 IST

जि.प.निवडणुकांची रंगीत तालीम : मोठय़ा गावांचा समावेश, 26 सप्टेंबरला मतदान

नंदुरबार : जिल्ह्यातील 66 मोठय़ा ग्रामपंचायतींची रणधुमाळी 27 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. 26 सप्टेंबरला मतदान होणार आहे. शहादा, नंदुरबार, नवापूर जिल्ह्यातील अनेक मोठय़ा ग्रामपंचायतींचा त्यात समावेश आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीची ही रंगीत तालीम  राहणार आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षाचे लक्ष निवडणुकांकडे राहणार आहे.नोव्हेंबर महिन्यात मुदत संपणा:या ग्रामपंचायतींचा निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने घोषीत केला आहे. त्यानुसार सप्टेंबरच्या शेवटच्या आठवडय़ात अर्थात 26 सप्टेंबर रोजी या ग्रामपंचायतींसाठी मतदान होणार आहे. निवडणुका असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये अनेक मोठय़ा आणि जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या ग्रामपंचायतींचा समावेश राहणार आहे. त्यामुळे सर्वच    राजकीय पक्षांकडून या ग्रामपंचायती ताब्यात घेण्यासाठी चढाओढ राहणार आहे. थेट जनतेतून सरपंच निवड असल्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकांनाही आता मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे.या आहेत ग्रामपंचायतीशहादा तालुक्यातील गावांमध्ये आडगाव, कमरावद, कुढावद, कजर्ाेत, गोगापूर, गणोर, बिलाडीतर्फे सारंगखेडा, करजई, जयनगर, पिंप्री, दामळदा, लांबोळा, लोंढरे, लक्कडकोट, विरपूर, वाघोदा, उजळोद, कवळीथ, कुसूमवाडे, जाम, तितरी, नवानगर, देऊर, मलोणी, भोरटेक, सोनवलतर्फे बोरद, सावळदे, अनरद, गोदीपूर, बोराळे, वाघर्डे, श्रीखेड.नंदुरबार तालुक्यातील कोरीट, भागसरी, धामडोद,  वावद, उमर्देखुर्द, आडछी, केसरपाडा, ईसाईनगर, सैताणे, बलवंड, बह्याणे, कलमाडी, समशेरपूर, लोणखेडा, जांभीपाडा, गुजर जांभोली, पिंपळोद, अक्राळे, होळतर्फे रनाळे, सुजालपूर, जुनमोहिदा, नाशिंदे, बोराळे.नवापूर तालुक्यातील श्रावणी, निंबोणी, खोलविहिर, सुळी, सोनखडके.तळोदा तालुक्यातील लाखापूर फॉरेस्ट, इच्छागव्हाण, राणापूर, मालदा तर अक्कलकुवा तालुक्यातील काठी व मालपाडा या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.रंगीत तालीमया निवडणुका म्हणजे ऑक्टोबर महिन्यात होणा:या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची रंगीत तालीम राहणार आहे. यंदा या दोन्ही निवडणुका अतिशय अटीतटीच्या आणि तेवढय़ाच प्रतिष्ठेच्या राहणार आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त मोठय़ा ग्रामपंचायती ताब्यात घेण्यासाठी काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी, सेना व इतर सर्वच राजकीय पक्ष प्रय}शील राहणार आहेत. थेट सरपंच निवडनिवडणुका होणा:या 66 ग्रामपंचायतींमध्ये प्रथमच थेट सरपंच निवड होणार आहे. त्यामुळे या गावांमध्ये मोठय़ा राजकीय घडामोडी घडणार आहेत. त्यादृष्टीने तयारीही सुरू करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने अचानक निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्याने आता या गावांमध्ये एकच         धावपळ उडणार आहे. येत्या 5 सप्टेंबरपासून निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यास सुरवात होणार   आहे. ऑनलाईन अजर्या निवडणुकीसाठी नवीन नियमाप्रमाणे ऑनलाईन अर्ज दाखल करावे लागणार आहेत. त्याची मुळप्रत निवडणूक निर्णय अधिका:यांकडे दाखल करावी लागणार आहे. निवडणुकीची सर्व प्रक्रिया संगणक प्रणालीद्वारे होणार आहे. याशिवाय तहसीलदारांनी निवडणुकीचा कार्यक्रम घोषीत केल्याच्या तारखेपासून ते मतदान होईर्पयत या गावांमध्ये आचारसंहिता लागू राहणार आहे. त्यामुळे सप्टेंबरपासून ते ऑक्टोबर अखेर्पयत अर्थात जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका होईर्पयत या गावांना आचारसंहितेचा अडसर राहणार आहे. त्यामुळे सलग दोन ते अडीच महिने या गावांना आचारसंहितेत काढावे लागणार आहेत.