कोरोनाबाधिताच्या संपर्कात आलेल्या ५८ जण नवापूरच्या क्वारंटाईन कक्षात रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2020 11:37 AM2020-06-04T11:37:05+5:302020-06-04T11:37:13+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क विसरवाडी : नवापुर तालुक्यातील पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण म्हणून नोंद झालेल्या ४८ वर्षीय व्यक्तीच्या संपर्कातील ५८ ...

58 people who came in contact with the coroner were sent to the quarantine room in Navapur | कोरोनाबाधिताच्या संपर्कात आलेल्या ५८ जण नवापूरच्या क्वारंटाईन कक्षात रवाना

कोरोनाबाधिताच्या संपर्कात आलेल्या ५८ जण नवापूरच्या क्वारंटाईन कक्षात रवाना

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
विसरवाडी : नवापुर तालुक्यातील पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण म्हणून नोंद झालेल्या ४८ वर्षीय व्यक्तीच्या संपर्कातील ५८ जणांना नवापूर येथे कोरोंटाईन करण्यात आले आहे़ यातील अती संपर्कातील तिघांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. उर्वरित व्यक्तींची वेळोवेळी आरोग्य तपासणी केली जात असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. हरीश्चंद्र कोकणी यांनी दिली आहे़
मुंबईहून नवापूर तालुक्यात आलेल्या प्रथम कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील विसरवाडी, माचाहोंडा, गडदाणी व बोरपाडा येथील एकूण ५८ व्यक्तींना नवापूर येथील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आलेले आहे़ यापैकी तीन व्यक्तींचे स्वॅब चे नमुने घेण्यात आले आहेत. या रुग्णाने विसरवाडी येथील खाजगी दोन वेगवेगळ्या दवाखान्यात उपचार घेतले होते. त्यामुळे दोन डॉक्टर व  एक परिचारिका, मसाज करणारा यांना देखील क्वारंटाईन करण्यात आले आहे़ तसेच काही व्यक्तींना घरीच क्वारंटाईन करण्यात आले आहे. या व्यक्तीचा विसरवाडी येथे एका सलून दुकानाशी संपर्क आल्याचे बोलले जात आहे़ मात्र अध्याप सलून दुकानदाराला क्वारंटाईन करण्यात आलेले नाही. सलून दुकानाशी या व्यक्तीचा संपर्क आलेला नसल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले आहे.
कोरोनाबाधिताचा विसरवाडी गावाशी संपर्क आल्याची माहिती समजल्यानंतर ग्रामपंचायत प्रशासनाने पूर्ण गावात जंतुनाशक फवारणी केली आहे़ तसेच येथील सरपंच बकाराम गावीत यांनी गाव सहा दिवस बंद ठेवण्याचे निर्णय घेतला आहे़ सोमवारी रात्रीच पूर्णपणे बॅरीकेड लावून गाव सील करण्यात आले आहे़ दरम्यान विसरवाडी येथे आरोग्य पथकाकडून घरोघरी प्रत्येक नागरिकाची आरोग्याची माहिती घेतली जात आहे. प्रशासनाने विसरवाडी व माचाहोंडा ही दोन गावे कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित केलेली आहेत़ या गावांचे व्यवहार पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहेत़ जिल्ह्यासह परजिल्ह्यातील नागरिक व ग्रामीण भागातील नागरिकांना विसरवाडी गावात प्रवेशबंदी करण्यात आली आहे़ कंटेन्मेंट झोनमधील व्यक्तींना जीवनावश्यक वस्तू घरपोच पोहोचवण्याची व्यवस्था केली जाणार असल्याची माहिती ग्राम विकास अधिकारी कैलास सोनवणे यांनी दिली आहे़ बफर झोनमध्ये जुनी विसरवाडी, बालाहाट, बालअमराई, नवापाडा, कन्हाळा, कुंभारपाडा,  बोदवड या गावांचा समावेश आहे. तहसीलदार सुनिता जºहाड यांनी याबाबत आदेश काढून विविध सूचना केल्या आहेत़ गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ़ हरीश्चंद्र कोकणी, सहायक पोलिस निरीक्षक गणेश न्हायदे हे परिसरात वेळोवेळी भेटी देत आहेत़

Web Title: 58 people who came in contact with the coroner were sent to the quarantine room in Navapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.