शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

९० दिवसांत ५२ बालके दगावली, ४०९ तीव्र कुपोषित

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2022 09:26 IST

४०९ तीव्र कुपोषित, आहारासाठी खटाटोप

नरेंद्र जावरे लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा (जि. अमरावती) : कुपोषणाने ग्रासलेल्या मेळघाटात अवघ्या तीन महिन्यांत तब्बल ५२ बालकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती आहे. मृतांमध्ये उपजत १७ आणि शून्य ते सहा वर्षे वयोगटातील ३५ बालकांचा समावेश आहे. तीव्र कुपोषणाने ४०९ बालके पीडित आहेत. धारणी व चिखलदरा तालुक्यांतील या बालकांना वाचविण्यासाठी अंगणवाडी केंद्रांमधून अमायलेजयुक्त पोषण आहार देण्याचा खटाटोप सुरू आहे. देशाच्या पहिल्या आदिवासी राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू यांनी शपथ घेतली, त्याच दिवशी आदिवासी भागा हे वास्तव पुढे यावे, यापेक्षा दुर्दैव ते कोणते.

धारणी व चिखलदरा तालुक्यांत न्यायालयाच्या निर्देशानुसार शासनाच्या विविध योजना कार्यान्वित आहेत. बालविकास प्रकल्प कार्यालयांतर्गत दोन्ही तालुक्यांत ४२५ पेक्षा अधिक अंगणवाडी केंद्रांतून स्तनदा, गर्भवती माता व शून्य ते सहा वर्षे वयोगटातील बालकांना पौष्टिक आहार शिजवून दिला जातो. जलजन्य आजाराची लागण होऊन कमी होणारे वजन आणि विविध आजारांनी मृत्यू पाहता मेळघाटातील बालकांची पावसाळ्यात अत्यंत जोखीम असते. धारणी व चिखलदरा तालुक्यांत कुपोषणाच्या तीव्र श्रेणीतील सॅममध्ये एप्रिल, मे  महिन्यांत २१३ बालकांचा समावेश होता. जून महिन्यात केलेल्या सर्वेक्षणात हा आकडा ४०९ झाला आहे. तीव्र कुपोषित व मध्यम कुपोषित ३७५६ बालकांसाठी १ ते ३० जुलैदरम्यान पेसा कायद्यांतर्गत व्हीसीडीसी उघडण्यात आले आहे.

उपजत १७ बालके दगावली

सर्वसाधारण श्रेणीत ३२,५७६ व मॅममध्ये ३,३४७ बालके आहेत. ३,८२० गरोदर व ३,४१० स्तनदा माता आहेत. 

तीन महिन्यांत उपजत आणि शून्य ते सहा वयोगटातील ५२ बालकांचा मृत्यू झाला. गतवर्षीपेक्षा १५ ने हा आकडा कमी आहे. पावसाळ्याचे दिवस पाहता आरोग्य सुविधा, आहार पुरविला जात आहे.- दिलीप रणमले, जिल्हा आरोग्य अधिकारी

 

टॅग्स :nandurbar-acनंदुरबारhospitalहॉस्पिटलdocterडॉक्टर