शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
3
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
4
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
5
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
6
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
7
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
8
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
9
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
10
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
11
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
12
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
13
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
14
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
15
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
16
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
17
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
18
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
19
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
20
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."

४०० शिक्षकांना द्यावी लागेल आणखी वर्षभर अवघड भागात सेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 12:49 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : यंदा जिल्हाअंतर्गत आॅनलाईन आणि आॅफलाईन देखील बदल्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे दुर्गम डोंगराळ ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : यंदा जिल्हाअंतर्गत आॅनलाईन आणि आॅफलाईन देखील बदल्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे दुर्गम डोंगराळ भागातून सपाटीवरील भागात येणाऱ्या जवळपास ४०० पेक्षा अधीक शिक्षकांना आणखी वर्षभर दुर्गम भागात राहावे लागणार आहे. यात शिक्षिकांची देखील मोठी संख्या आहे.कोरोनामुळे यंदा जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या राज्यस्तरावरून होणाºया आॅनलाईन बदल्या रद्द करण्यात आल्या होत्या. यंदा आॅनलाईन बदल्यांमध्ये काही बदलही केले जाणार होते. परंतु शासनाने आॅनलाईन बदल्याच रद्द केल्याने प्रस्तावीत बदलही झाले नाहीत. त्यानंतर शासनाने पुन्हा आदेश काढून शिक्षकांच्या आॅफलाईन बदल्या स्थानिक स्तरावरच १५ टक्केच्या मर्यादेत कराव्या असे आदेश काढले. प्रशासकीय आणि विनंती बदल्यांबाबत हे आदेश होते. त्यासाठी सेवा ज्येष्ठता यादी, त्यावरील हरकती आणि इतर सर्व बाबींची प्रक्रीया केली गेली. परंतु शासनाने ऐनवेळी प्रशासकीय बदल्या करू नये केवळ विनंती बदल्या कराव्या असे आदेश काढले. त्यानंतर विनंती बदल्यांबाबतचीही प्रक्रिया राबविली गेली. परंतु ऐनवेळी स्थानिक स्तरावर निर्णय होऊन विनंती बदल्याही यंदा रद्द करण्यात येत असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी जाहिर केले.या सर्व गोंधळात बदलीपात्र शिक्षक मात्र नेहमीच संभ्रमात राहिले. आता विनंती बदल्याही रद्द करण्यात आल्याने बदलीपात्र शिक्षकांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात आली.यंदा दुर्गम भागातील ४०० शिक्षक बदलीपात्र होते. गेल्या अनेक वर्षांपासून ते दुर्गम, पहाडी भागात सेवा देत आहेत. आता त्यांचा सपाटीवरील भागात बदलीचा हक्क असतांना यंदा या बदल्याच रद्द करण्यात आल्या. त्यामुळे आणखी एक वर्ष या शिक्षकांना दुर्गम भागात थांबावे लागणार आहे. शिवाय पुढील वर्षी जे बदलीपात्र शिक्षक होते त्यांच्यावरही या निर्णयामुळे पुढील वर्षी अन्यायच होणार आहे.आॅनलाईन बदल्या करतांना शासनाने अवघड आणि सोपे क्षेत्र असा फरक केला आहे. अवघड क्षेत्रात प्रत्येक शिक्षकाला सेवा करणे भाग आहे. त्यानुसार अनेक महिला शिक्षिकांची अवघड क्षेत्रात बदली झाली आहे. अशा शिक्षिका आता बदलीपात्र होत्या परंतु त्यांना आणखी एक वर्ष अवघड क्षेत्रात काम करावे लाागणार आहे.

जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या म्हणजे जिल्हा परिषद प्रशासनाची मोठी डोकेदुखी राहत होती. त्यामुळे राज्यस्तरावरच थेट आॅनलाईन बदल्यांचा पर्याय पुढे आला. यंदा कोरोनामुळे त्या होणार नसल्याने आॅफलाईनचे आदेश येताच प्रशासनाचा डोक्याचा ताण वाढला होता. त्यातच प्रशासकीय रद्द केल्या. परंतु नंदुरबार जिल्हा प्रशासनाने विनंती बदल्याही रद्द करून डोक्याला ताणच घेतला नाही.