शहरी अन् ग्रामीण भागातून समोर आले डेंग्यूचे 40 रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2019 12:04 PM2019-10-16T12:04:04+5:302019-10-16T12:04:12+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही ठिकाणी डेंग्यूचा प्रभाव कायम असून डेंग्यूचे 40 रुग्ण ...

40 dengue patients come from urban and rural areas | शहरी अन् ग्रामीण भागातून समोर आले डेंग्यूचे 40 रुग्ण

शहरी अन् ग्रामीण भागातून समोर आले डेंग्यूचे 40 रुग्ण

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही ठिकाणी डेंग्यूचा प्रभाव कायम असून डेंग्यूचे 40 रुग्ण खाजगी आणि सरकारी रुग्णालयात दाखल आहेत़ रुग्णांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी  आरोग्य यंत्रणेने उपाययोजनांना वेग दिल्याची माहिती देण्यात आली आह़े 
डेंग्यूच्या साथीमुळे शहरी भागातील नागरिक त्रस्त असतानाच मंगळवारी दिवसभरात ग्रामीण भागात डेंग्यूचा फैलाव झाल्याचे आरोग्य यंत्रणेने संकलित केलेल्या रक्तनमुन्यांच्या अहवालातून समोर आले आह़े सर्वाधिक प्रभावित क्षेत्र असलेल्या नंदुरबार शहरात पालिकेने गेल्या दोन दिवसात दक्षता घेत कामांना वेग दिला आह़े आजअखेरीस डेंग्यूचे संशयित रुग्ण असलेल्या गाजीनगर, राजीव गांधीनगर, कुरेशी मोहल्ला, बागवान गल्ली, मच्छीमार्केट, संभाजीनगरसह शहरातील 150 जागा निश्चित करुन तेथे धूरफवारणी करण्यात आली आह़े शहरात डेंग्यूचे सर्वाधिक रुग्ण असल्याने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ़ एऩडी़बोडके यांच्या मार्गदर्शनात आरोग्य विभागा 36 कर्मचारी 16 पथकांमधून जागोजागी भेटी देत डेंग्यूच्या डासांचा शोध घेत आहेत़ यात प्रामुख्याने सव्रेक्षण करुन रक्तनमुने घेतले जात आहेत़ येत्या दोन दिवसात शहरातील सर्वच ठिकाणे सव्रेक्षण करुन साथ आटोक्यात आणण्याचे उद्दीष्टय़ ठेवल्याचे सांगण्यात आले आह़े 
एकीकडे आरोग्य विभाग उपाययोजनेत मगA असली तरी डेंग्यूचे रुग्ण समोर येणे थांबत नसल्याचे दिसून आले आह़े जिल्हा रुग्णालयात विविध वॉर्डात तापाचे 10 संशयित रुग्ण दाखल असून डेंग्यूची लागण झालेल्या तिघांवर यापूर्वीच उपचार सुरु आहेत़ मंगळवारी डेंग्यूची बाधा झालेल्या एका रुग्णास प्रशासनाने तातडीने धुळे येथे हलवल्याची माहिती देण्यात आली आह़े दरम्यान खाजगी रुग्णालयात तापाची लागण झालेले 77 च्या जवळपास रुग्ण दाखल आहेत़ त्यांच्या रक्तनमुन्यांचा अहवाल अद्याप प्राप्त व्हायचा असल्याने रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ होण्याची शक्यता आह़े  
जिल्ह्यात डेंग्यूची स्थिती गंभीर असल्याने मंगळवारी नाशिक विभागीय साथरोग संचालक डॉ़ अर्चना पाटील यांच्यासह विभागीय अधिका:यांच्या पथकाने भेट देत माहिती जाणून घेतली़ त्यांनी तळोदा, नवापुर आणि नंदुरबार शहरातील रुग्णालयांमध्ये भेटी देत पाहणी केली़ 

आजअखेरीस आरोग्य पथकांनी चार तालुक्यातून 562 रक्तनमुने संकलित केले होत़े यात 40 जणांना डेंग्यू असल्याचे स्पष्ट झाल़े सर्वाधिक गंभीर स्थिती नंदुरबार शहराची असून 11 जणांना डेंग्यू झाल्याचे समोर आले आह़े 139 संशयित रुग्णांची शहरात तपासणी करण्यात आली होती़ शहराला लागून असलेल्या ग्रामपंचायत हद्दींमधील वसाहतींमध्ये दोघांना डेंग्यू झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आह़े 

आरोग्य पथकांनी नवापुर तालुक्यात 204 रक्तनमुने तपासले होते यात 20 जणांना डेंग्यू असल्याचे सांगण्यात आले आह़े नवापुर शहरात दोघे डेंग्यूने बाधित आहेत़ शहादा शहरात 1, तळोदा तालुक्यात 2 रुग्ण डेंग्यूने बाधित आहेत़ सर्वाधिक 216 रक्तनमुने हे नंदुरबार शहर व परिसरात घेण्यात आले होत़े येत्या दोन दिवसातही रक्तनमुन्यांचे संकलन सुरु राहणार असल्याची माहिती आह़े 
 

Web Title: 40 dengue patients come from urban and rural areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.