नोकरीच्या बहाण्याने युवकाची ३१ हजारात फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2020 12:06 PM2020-09-24T12:06:43+5:302020-09-24T12:06:50+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नोकरीच्या बहाण्याने युवकाची आॅनलाईन ३० हजार ९०० रुपयात फसवणूक केल्याची घटना नंदुरबारात घडली. याप्रकरणी ...

31 thousand cheated youth under the pretext of job | नोकरीच्या बहाण्याने युवकाची ३१ हजारात फसवणूक

नोकरीच्या बहाण्याने युवकाची ३१ हजारात फसवणूक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : नोकरीच्या बहाण्याने युवकाची आॅनलाईन ३० हजार ९०० रुपयात फसवणूक केल्याची घटना नंदुरबारात घडली. याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनुसार, नंदुरबारातील देसाईपुरा भागात राहणारा शुभम दिनेश श्रॉफ या युवकाला राहुलसिंग नामक व्यक्तीने नोकरीचे अमिष दाखविले. त्यासाठी त्यांच्याकडे पैशांची मागणी केली. त्यांनी ३० हजार ९०० रुपये त्यांचे काका मनोज सुभाष सोनार यांच्या सेंट्रल बँक आॅफ इंडिया बँकेच्या शाखेचा खाते क्रमांक, डेबीट कार्ड क्रमांक व ओटीपी नंबर दिला. ओटीपी नंबर मिळताच संबधीत राहुलसिंग नामक व्यक्तीने ३० हजार ९०० रुपये काढून घेतल्याचे त्यांच्या लक्षात आले.
१८ सप्टेबर रोजी ही घटना घडली. त्यांनी बँकेत तसेच इतर ठिकाणी तपास केला असता त्यांना आपण फसविलो गेल्याचे लक्षात आले. त्यानंतर शुभम श्रॉफ यांनी फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरिक्षक रवींद्र कळमकर करीत आहे.
दरम्यान, आॅनलाईन फसवणुकीबाबत विविध माध्यमातून जनजागृती होत असतांनाही शिक्षीत युवक तसेच अशिक्षीत लोकं त्यास बळी पडत आहेत. आॅनलाईनच्या माध्यमातून कुणालाही आपल्या बँकेचे डिटेल आणि एटीएम कार्डचा तपशील देऊ नये.
कुणाला याबाबत शंका असल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन देखील पोलीस विभागातर्फे करण्यात आले आहे.

Web Title: 31 thousand cheated youth under the pretext of job

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.