शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
2
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
3
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
4
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
5
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
6
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
7
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
8
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
9
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
10
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
11
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
12
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
13
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
14
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
15
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
16
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
17
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
18
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
19
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
20
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...

प्रकाशा येथील भजन स्पर्धेत 30 मंडळांचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2019 12:44 IST

लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा : विविध शहर ग्राम लेवा पाटीदार ग्लोबल गुजर मंडळातर्फे रविवारी येथील सद्गुरू धर्मशाळेत ‘संत तुकाराम ...

लोकमत न्यूज नेटवर्कप्रकाशा : विविध शहर ग्राम लेवा पाटीदार ग्लोबल गुजर मंडळातर्फे रविवारी येथील सद्गुरू धर्मशाळेत ‘संत तुकाराम महाराज भजन स्पर्धे’चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेशातील 30 भजनी मंडळांनी सहभाग नोंदवला.स्पर्धेचे उद्घाटन भागवत कथाकार कृष्णानंद महाराज (हरिद्वार) यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी  प.पू. जिज्ञासा दीदी, महेंद्र पटेल, मगन चौधरी, हरी पाटील, मोहन चौधरी, किशोर चौधरी,  भगवान पटेल उपस्थित होते. स्पर्धेत शहादा, मामाचे मोहिदे, सुजालपूर, बामखेडा, निझर, कहाटूळ, डामरखेडा, कोरीट, आडछी, चिंचोदा, फेस, लहान शहादे, वडछील, पुणे, गुजरभवाली, कोळदे, त:हाडी, पळाशी, प्रकाशा, मलोणी, अंकलेश्वर, विद्याविहार, दामळदा, चांदपुरी, सुरत, बोरद, लहान लोणखेडा येथील भजनी मंडळांनी सहभाग नोंदवला.  या स्पर्धेत रास, अभंग, गवळण, भाव-भक्ती असे विविध गीते सादर करण्यात आली. स्पर्धेसाठी प्रत्येक भजनी मंडळाला 12 मिनीटांचा वेळ देण्यात आला. काही भजनी मंडळांनी गरबा, रास, नृत्य सादर करून जीवंत देखावा सादर केला. काही मंडळातील कलावंतांनी एकाच रंगाचा ड्रेस, साडी घालून भजन सादर केले. यात बोरद येथील बासरीवादक कन्हैयालाल पटेल यांचे बासरीचे वादन मंत्रमुग्ध करणारे ठरले. परीक्षक म्हणून पंडितराव बोरसे (धुळे), वसंत नारद (कोपरगाव), राहुल खेडकर (नंदुरबार), रामकृष्ण मराठे (सुरत) यांनी काम पाहिले. प्रास्ताविक डॉ.प्रशांत पाटील यांनी केले. सूत्रसंचालन किरण चौधरी व हेमंत पाटील यांनी तर आभार प्रवीण पाटील व  डॉ.प्रफुल्ल पटेल यांनी मानले.स्पर्धेचा निकालस्पर्धेनंतर त्याचा निकाल जाहीर करण्यात आला. भजन स्पर्धेतील पुरूष गटात प्रथम सिध्देश्वर भजनी मंडळ कोरीट, ता.नंदुरबार, द्वितीय हरिओम भजनी मंडळ म्हसावद, ता.शहादा, तृतीय संत ज्ञानेश्वर भजनी मंडळ मामाचे मोहिदे, ता.शहादा. महिला गटात प्रथम संत मिराबाई भजनी मंडळ विद्याविहार, ता.शहादा, द्वितीय सरस्वती भजनी मंडळ शहादा, तृतीय जय अंबे भजनी मंडळ लोणखेडा, ता.नंदुरबार. रास गायन स्पर्धेत प्रथम न्यू बामखेडा, ता.शहादा, द्वितीय बामखेडा, ता.शहादा तृतीय कहाटूळ, ता.शहादा. उत्कृष्ट गायक पुरूष गटात सागर प्रकाश पाटील (हरिओम भजनी मंडळ म्हसावद), उत्कृष्ट गायक महिला गटात   नीलिमा पाटील, हर्षा पाटील (सरस्वती भजनी मंडळ शहादा). उत्कृष्ट तबला वादक स्पर्धेत कृष्णकांत जगन चौधरी (प्रकाशा, ता.शहादा). उत्कृष्ट हार्मोनियम वादक स्पर्धेत अशोक चौधरी (न्यू बामखेडा, ता.शहादा) यांची निवड करण्यात आली.

याच कार्यक्रमात वृक्ष लागवडीसाठी विविध प्रजातीच्या 1200 रोपांचे वाटप करण्यात आले. त्यात राकेश पटेल (सोनगढ) यांनी 700 तर जगदीश पटेल (सुरत) यांनी 500 रोपे दिली.या स्पर्धेसाठी आलेल्या भजनी मंडळातील कलावंत व उपस्थितांना चहा-नाश्त्याची व्यवस्था करजकुपा ग्रामस्थांनी तर भोजनाची व्यवस्था काहाटूळ ग्रामस्थांनी केली होती. भागवत साऊंडचे संचालक रवींद्र पटेल यांनी साऊंड सिस्टीमसह स्मृतीचिन्ह उपलब्ध करून दिले.यंदा व्हीएसजीजीएम मंडळातर्फे यंदा झालेल्या सामूहिक विवाह सोहळ्यात सहभागी वरांना इंदूर गुजर समाज ग्रुपतर्फे हेल्मेटचेही या कार्यक्रम वाटप करण्यात आले.