शहरं
Join us  
Trending Stories
1
"फिरायला गेले नव्हते..."! प्रियांका गांधी अमित शाह यांच्यावर भडकल्या; थायलंडला कशासाठी गेल्या होत्या? स्पष्टच सांगितलं
2
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
3
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
4
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
5
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
6
'कपिल शर्मा शो' च्या जागी येतोय 'झाकीर खान शो'? कॉमेडी अन् शायरीची असणार मेजवानी
7
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं
8
मुसलमान आणि आमचा DNA एकच; मुलाच्या प्रचारावेळी बोलताना ब्रिजभूषण भावूक  
9
12वी पास कंगनाकडे कोट्यवधींचे हीरे, एकाच दिवसात खरेदी केल्या LIC च्या 50 पॉलिसी, जाणून घ्या किती आहे संपत्ती?
10
गंभीर हसल्याशिवाय क्रशला प्रपोज करणार नाही; तरूणीच्या पोस्टरला भारतीय दिग्गजाचं उत्तर
11
मराठमोळ्या अभिनेत्रीला झालाय गंभीर आजार, व्हिडिओ शेअर करत म्हणाली, 'मी प्रेग्नंट नाही...'
12
"आमच्या घरी ईद साजरी केली जायची"; पंतप्रधान मोदींनी सांगितला मुस्लिम शेजाऱ्यांचा किस्सा
13
निवडणूक प्रचारात कांद्यासाठी आंदोलनाची घोषणा; पण लंकेंनी आता शेतकऱ्यांना केलं नवं आवाहन!
14
PM Modi Net Worth: कोणत्या बँकेत आहे PM नरेंद्र मोदींचं खातं, कुठे आहे गुंतवणूक? पाहा डिटेल्स
15
सत्तापिपासून भाजपा मृतदेहांवरून रॅली काढतंय का? मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून काँग्रेसचा जळजळीत सवाल
16
'लोकांचा जीव जातोय आणि हिला डान्स सुचतोय'; पाऊस पडल्यानंतर रील केल्यामुळे मन्नारा चोप्रा ट्रोल
17
'नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा नक्कीच पंतप्रधान होतील, आम्हालाही त्यांच्यासारख्या नेत्याची गरज; पाकिस्तानी अब्जाधीशांनी केले कौतुक
18
Kangana Ranaut : "तुम्ही मला एकदा मारलंत तर अनेक वेळा..."; कंगना राणौतचं विक्रमादित्य सिंहांवर टीकास्त्र
19
'अनिल कपूरसारखा पती नको' असं का म्हणाली होती माधुरी दीक्षित? इंटरेस्टिंग आहे यामागचं कारण
20
IPL Playoffsच्या २ जागांसाठी ५ संघ शर्यतीत; SRH ला ८७.३%, CSK ला ७२.७% टक्के चान्स, तर RCBला...

बालमेळाव्यात ७५० बालकांचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2020 12:52 PM

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : नर्मदा बचाव आंदोलनामार्फत चालविण्यात येणाऱ्या जीवन शाळांमधील विद्यार्थ्यांच्या बालमेळाव्याचे उद्घाटन गुरूवारी तालुक्यातील तºहावद पुनर्वसन ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : नर्मदा बचाव आंदोलनामार्फत चालविण्यात येणाऱ्या जीवन शाळांमधील विद्यार्थ्यांच्या बालमेळाव्याचे उद्घाटन गुरूवारी तालुक्यातील तºहावद पुनर्वसन येथे प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या मेळाव्यात साधारण ७५० विद्यार्थी सहभागी झाले आहेत. या बाल मेळाव्व्यात विविध मैदानी स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल पहायला मिळणार आहे.सरदार सरोवर प्रकल्पात बाधित झालेल्या विस्थापितांच्या मुला-मुलींसाठी नर्मदा बचाव आंदोलन निवासी जीवन शाळा गेल्या अनेक वर्षापासून चालवित आहे. या जीवन शाळांमधील विद्यार्थ्यांना एकत्र करून त्यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी आंदोलनामार्फत बाल मेळाव्याचे आयोजन करण्यात येत असते. चार दिवसीय बाल मेळाव्याचे उद्घाटन प्रसिद्ध लेखिका डॉ.श्रृती पानसे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अ‍ॅड.सीमा वळवी, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड, माजी खासदार मिनाक्षी नटराजन, चिन्मय मिश्रा, लवासा आंदोलनाच्या सुनिती सूर, मेधा पाटकर, सर्पदंश संस्थेच्या प्रियंका कदम, इब्राहिम खान, युवराज गटकर, हैदर नुरानी, माणक चौधरी, प्रा.प्रदीप पाटील, अनिल कुवर, हनिफ तडवी, सरपंच विश्रांती वळवी अशा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.या बाल मेळाव्यात सात जीवन शाळांमधील साधारण ७५० विद्यार्थी सहभागी झाले आहेत. याप्रसंगी पाहुण्यांच्या हस्ते आकाशात तिरंगी फुले सोडून प्रत्येक शाळेच्या विद्यार्थ्यांी आपला झेंडा रोवला होता. साहजिकच यामुळे परिसरातील शैक्षणिक वातावरण ढवळून निघाले होते. या वेळी लेखिका श्रृती पानसे यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, आंदोलनामार्फत सुरू असलेल्या शायांमध्ये जीवनाचे शिक्षण दिले जात असते. त्यामुळे विद्यार्थ्यांना आपोआपच स्वालंबनाचे धडे मिळत असतात. तसेच शाळेच्या विकासासाठी पालकांबरोबरच कार्यकर्ते, शिक्षक, विद्यार्थीही मेहनत घेत असतात. या वेळी त्यांनी विद्यार्थी शिक्षकांशी सुसंवाद साधला होता. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अ‍ॅड.सीमा वळवी यांनी जीवन शाळांना जिल्हा परिषदेकडून सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांनी आपल्यापुढे सगळ्याच समस्यांचा डोंगर उभार आहे. तरीही हिंमत न हारता दुर्गम, वंचित भागातील विकासाकरीता पुरेपूर प्रयत्न करीत आहे. चंदन मिश्रा, सुनिता सूर यांनीही मार्गदर्शन केले होते. प्रास्ताविक तुकाराम पावरा यांनी केले.सूत्रसंचालन आंदोलनाचे कार्यकर्ते चेतन साळवे यांनी मानले. कार्यक्रमासाठी लतिका राजपूत, जातर वसावे, पुन्या वसावे, ओरसिंग पटले, शामजी पाडवी, सियाराम पाडवी, दिलवर पाडवी, जीवन शाळांचे सर्व शिक्षक, पालक परिश्रम घेत आहेत.

 

नर्मदा बचाव आंदोलनामार्फत गुरूवारी सुरूवात करण्यात आलेल्या जीवन शाळांमधील विद्यार्थ्यांच्या बाल मेळाव्यात दिवसा कबड्डी, खो-खो, लांब उडी, उंच उडी, धनुर्विद्या, लिंबू चमचा अशा विविध मैदानी स्पर्धांबरोबरच चित्रकला, वक्तत्व स्पर्धा व वैयक्तिक नृत्य, सांघिक नृत्य, गीत गायन, नाटीका, आदिवासी नृत्ये अशा सांस्कृतिक कार्यक्रमाची तब्बल चार दिवस रेलचेल राहणार आहे. या कार्यक्रमात पुणे-मुंबई येथील कलाकारदेखील सहभागी होणार आहेत.