याबाबत अधिक माहिती अशी की,अक्कलकुवा तालुक्यातील भगदरी येथून लग्नानिमित्त सर्व जण सोमवल पीक अप गाडीने (क्रमांक एम एच ३९ सी ९८६४) येथे येत होते. अक्कलकुवा ते मोलगी रस्ता बंद असल्याने भगदरी येथिल वऱ्हाडी चांदसैली घाट-कोठार ते तळोदा मार्गे सोमावल येथे जात होते. चांदसैली घाट सुखरूप उतरल्यानंतर कोठार आश्रमशाळे पुढील उतारावरचे शेवटचे वळण पार करत असताना गाडीचे ब्रेक निकामी झाले. त्यामुळे चालकाचे गाडी वरील नियंत्रण सुटले व गाडी सरळ टेकड्यावरून खाली कोसळली. हा अपघाता झाला तेव्हा गाडीत २७ प्रवासी प्रवास करीत होते.
त्यातील सोनी मोत्या वसावे (५०), मोत्या बुधा वसावे (३८), हातुबई दमन्या वसावे (४५), ब्रिज्या सारपा वसावे (५०),अशोक खाल्या वसावे (२५), तेजला वेज्या वसावे (४०), रविंद्र तेड्या वसावे (१८) ,दादला इन्द्या वसावे (२७), रुपसिंग तेज्या वसावे (२७), केना सारपा वसावे (५६), काल्या भिगजी पाडवी (४०),सर्व रा भगदरी या ११ जणांना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तर दिल्या मोत्या वसावे, बबन सेमट्या वळवी यांच्यासह उर्वरित १६ जण किरकोळ जखमी असल्याने त्यांना तळोदा उपजिल्हा रुग्णलयात उपचार करण्यात आले.
अपघात झाल्यानंतर आपात्कालीन सेवेच्या रुग्णांवाहिका तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. या रुग्णवाहिकेतील डॉ. चेतन रातावळे यांनी चालक राजू परदेशी, कल्पेश पावरा याच्या मदतीने रुग्णांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.