शहरं
Join us  
Trending Stories
1
'मंत्र्यावर बिबटे सोडा', उद्या पाकिस्तानातील लोक मंत्री म्हणून येतील', सुधीर मुनगंटीवारांचा विधानसभेत पारा चढला!
2
पडळकर-आव्हाड समर्थक राडा प्रकरणी अहवाल सादर; "'त्या' कार्यकर्त्यांना २ दिवस कारावास अन्..."
3
तंबाखू आणि सिगारेट महागणार! केंद्र सरकारकडून उत्पादन शुल्कात ५ पट वाढ; नवीन किंमत काय असेल?
4
विधानसभेत मंत्री नितेश राणेंची कोपरखळी; "काल चिडलेले होते, वैयक्तिक भेटले तर मिठीही मारतात..."
5
पहिला अंडरवर्ल्ड डॉन हाजी मस्तानच्या मुलीची पंतप्रधानांना साद; 'माझ्यावर वारंवार बलात्कार, मदत करा, न्याय द्या'
6
रिस्क है तो...! कार डीलरचा मुलगा ते शेअर बाजाराचा 'बिग बुल'; हर्षद मेहताचा 'वाद'ळी प्रवास
7
“श्रमलेल्या बापासाठी लेक...”; शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त सुप्रिया सुळेंची खास पोस्ट
8
रुपयाचा ऐतिहासिक नीचांक! डॉलरच्या तुलनेत दर ९०.५६ रुपये; घसरण्याची ३ मोठी कारणे समोर
9
एकाच रिचार्जमध्ये मिळणार वाय-फाय, फोन आणि डीटीएच, हा प्लान खूप खास
10
Video - "तुला लाज वाटली नाही?"; नवऱ्याने बायकोला बॉयफ्रेंडसोबत OYO मध्ये रंगेहाथ पकडलं अन्...
11
मुलानं आईला मारलं, मग स्वतःलाही संपवलं; ChatGPT कारणीभूत? OpenAI वर खटला!
12
Kankavli: हरवलेल्या मोबाईलमुळे ‘त्या’ प्रेमी युगुलानं संपवलं जीवन, तपासातून धक्कादायक माहिती समोर   
13
आश्चर्यकारक! Tata च्या नवीन Sierra ने दिले 30 kmpl चे मायलेज; 222 kmph चा टॉप स्पीडही गाठला
14
हिरा निघाला 'हा' शेअर; ९० टक्के फायद्यावर लिस्टिंग, IPO मध्ये लागलेली फक्त २ पट बोली
15
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, सोनं 1.34 लाख पार तर चांदी 2 लाखांच्या उंबरठ्यावर; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
16
मॅक्सिको भारतावर नाही तर आपल्याच प्रगतीवर टाळं लावतोय, फेडावी लागेल मोठी किंमत
17
कोथरुडमध्ये मिळू लागले अवघ्या ८६ रुपयांना लीटर पेट्रोल; वाहनचालकांची उडाली झुंबड...
18
China Condom Tax: चीनमध्ये कंडोमवर भरपूर टॅक्स लादणार, जिनपिंग यांच्या धोरणाला विरोध का होतोय?
19
प. बंगालमध्ये आता बांधले जाणार राम मंदिर; भाजपा नेत्यांनी लावले पोस्टर, देणगी देण्याचे आवाहन
20
विनेश फोगाटचा यू-टर्न! पुन्हा कुस्तीच्या आखाड्यात परतणार, निवृत्तीचा निर्णय रद्द, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारात 25 हजार गणेशमूतींना मिळाला आकार

By मनोज.आत्माराम.शेलार | Updated: August 19, 2017 12:24 IST

कारखान्यांमध्ये राबताहेत शेकडो हात : गुजरातमध्ये मूर्ती नेण्यास सुरुवात, बाजारात चैतन्य

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : गणेशमूर्त्ीवर अखेरचा हात फिरविण्यात येत असून गुजरात व मध्यप्रदेशातील अनेक मोठय़ा मंडळांनी गणेशमूर्ती नेण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, वेळेवर मूर्ती तयार करून त्या मंडळांना सुपूर्द करण्यासाठी शहरातील सर्वच लहान मोठय़ा 22 मूर्ती कारखान्यांमध्ये शेकडो हात राबत आहेत. नंदुरबारातील गणेशमूर्ती उद्योगाला यंदा अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. जीएसटीचा फटका आहेच शिवाय नोटबंदी आणि विविध कच्चा मालाचे वाढलेले भाव यामुळे मूर्तीच्या किंमतींमध्ये काही प्रमाणात वाढ करावी लागली आहे. येथील मूर्ती कारखान्यात गेल्या तीन महिन्यांपासून कामाला सुरुवात झाली होती. सद्यस्थितीत अनेक मूर्ती तयार झालेल्या आहेत तर काही मूर्त्ीवर अंतिम हात फिरविला जात आहे.पाच इंच ते 15 फूटयेथील मूर्ती कारागिरांनी अवघ्या पाच इंच ते 15 फूट उंचीच्या गणेशमूर्ती तयार केलेल्या आहेत त्या सर्वच विक्रीसाठी सज्ज आहेत. जवळपास पाच हजार मोठय़ा मूर्ती तर 25 हजारापेक्षा अधीक लहान मूर्ती तयार करण्यात आलेल्या आहेत. घरगुती मूर्ती व्यावसायिकांनी लहान मूर्ती तयार केल्या आहेत. मोठय़ा मूर्ती या मूर्ती कारखान्यांमध्ये तयार केल्या जातात. मोठय़ा मूर्ती तयार करण्यासाठी विशेष मेहनत घ्यावी लागते. त्यासाठी विशिष्ट प्रकारचा साचा आणि    कच्चा माल तयार करावा लागतो. त्यानंतर मूर्तीमध्ये जिवंतपणा आणण्यासाठी कारागिराला मेहनत घ्यावी लागते.दोन महिन्यांपूर्वी ऑर्डरनंदुरबारातील मूर्ती कारागिर हे राज्यभरातील इतर मूर्ती कारागिरांशी संपर्क साधून त्यांच्याकडील प्रसिद्ध असलेल्या मूर्त्ीची माहिती घेतात. त्यानुसार साचा तयार करून त्या मूर्ती बनविण्यात येतात. पुण्याच्या दगडूशेठ हलवाई गणेशमूर्तीपासून ते लालबागचा राजा, कसबापेठ, कोल्हापूरचा राजा आदींसह तब्बल दीडशे प्रकार आहेत. मे महिन्यापासूनच विविध शहरातील मंडळ कार्यकते, व्यावसायिक व विक्रेते कुठल्या प्रकारच्या गणेशमूर्ती पाहिजे त्याची यादी व ऑर्डर देवून ठेवतात. त्यानुसार मूर्ती तयार करून त्या गणेशोत्सवाच्या किमान 15 दिवस अगोदर गणेशमूर्ती व्यावसायिक व विक्रेत्यांर्पयत पोहचविल्या जातात. यंदा देखील गेल्या आठवडय़ापासून मूर्ती पाठविण्यास सुरुवात झाली आहे. दररोज लहान, मोठय़ा मूर्ती भरून किमान तीन ते चार ट्रका बाहेरगावी जात आहेत. याशिवाय जिल्हाबाहेरील मंडळांनी बुकींग केलेल्या मूर्ती देखील रवाना केल्या जात आहेत.परराज्यातील मूर्ती विक्रेते देखील शहरात दाखल होऊ लागले आहेत. शहरातील स्टेट बँक रस्त्यावर विक्रेत्यांना जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यांच्याकडील मूर्त्ीना देखील ब:यापैकी मागणी असते.