शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
2
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
3
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
4
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले
5
चीनकडून कोण चोरतंय रेअर अर्थ मेटल? का उडालीये ड्रॅगनची झोप, काय आहे प्रकरण?
6
"आमदार माजलेत असं बाहेर म्हटलं जातंय, राजकारणाच्या पलीकडे जाणार की नाही?"; CM फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं
7
"पटोलेंनी उल्लेख केलेली व्यक्ती काँग्रेसचीच"; हनी ट्रॅपची कुठलीही तक्रार नसल्याचे CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
8
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
9
"विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार’’, बाळासाहेब थोरात यांची टीका 
10
"जितेंद्र आव्हाड राजकारणातून बाहेर पडले तर मला आवडेल, कारण...", पत्नी ऋता नेमकं काय म्हणाल्या?
11
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार; चांदीत ₹१३०० ची तेजी
12
Sara Ali Khan : फॅट टू फिट! ९६ किलो वजनाच्या साराने कसं कमी केलं तब्बल ४५ किलो वजन? 'हे' आहे टॉप सीक्रेट
13
'करेंगे दंगे चारों ओर', महाराष्ट्र विधानसभेतील हाणामारीवर कुणाल कामराने टीका केली; व्हिडीओ व्हायरल
14
Lunchbox Recipe: झटपट तयार होणारी 'पडवळ करी' एकदा ट्राय करा, दोन घास जास्तच जातील!
15
पाकव्याप्त काश्मीरमध्ये दिसला मसूद अजहर; आता बिलावल भुट्टो आपला शब्द खरा करणार का?
16
विदेशी सट्टेबाजांचा वायदे बाजारावर डाव, छोट्या गुंतवणूकदारांनो सजगतेनं करा बचाव!
17
विधिमंडळ परिसरात धक्काबुक्की प्रकरणी विधानसभा अध्यक्षांनी निर्णय दिला, दोषींवर होणार अशी कारवाई 
18
सोन्याची झळाळी कमी होणार, चांदीची चमक मात्र वाढणार; १३ टक्क्यांच्या तेजीचा अंदाज, किती जाऊ शकतो भाव?
19
शाहरुख खानच्या मेकअप रुमबाहेर काढला फोटो, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केला आनंद
20
"मोदींच्या नेतृत्वाखाली २०२९ निवडणूक लढवावी लागणे ही भाजपची मजबुरी"; भाजप खासदाराचे विधान

240 गावे व 210 पाडय़ांमध्ये टंचाई : नंदुरबार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 13:05 IST

नंदुरबार : जिल्ह्यात यंदा पाणी टंचाईच्या पाश्र्वभुमीवर 240 गावे व 210 पाडय़ांना उपाययोजनांसाठी तब्बल 11 कोटी 32 लाख 86 ...

नंदुरबार : जिल्ह्यात यंदा पाणी टंचाईच्या पाश्र्वभुमीवर 240 गावे व 210 पाडय़ांना उपाययोजनांसाठी तब्बल 11 कोटी 32 लाख 86 हजार रुपयांच्या खर्चाची तरतूद करण्यात आली आहे. त्यात 20 गावांना टँकर देखील प्रस्तावीत असून यात सर्वाधिक 18 गावे नंदुरबार तालुक्यातील आहेत. दरम्यान, 302 ठिकाणी विंधन विहिरी नव्याने करण्यात येणार आहेत.यंदा सरासरीच्या तुलनेत 30 टक्के कमी पाऊस झाला आहे. शासनाने चार तालुके संपुर्ण दुष्काळी तर दोन तालुके अंशत: दुष्काळी जाहीर केले आहेत. सर्वच महसुली गावांची पैसेवारी 50 पैशांच्या आत देखील जाहीर झालेली आहे. या पाश्र्वभुमीवर आता पाणी टंचाईचे संकट देखील गडद होत चालले आहे. त्यावर तीन टप्प्यात उपाययोजना करण्यास प्रशासनाने मंजुरी दिली आहे. त्यासाठी 11 कोटी 32 लाख 86 हजार रुपयांचा खर्च येणार आहे.यंदा 20 ठिकाणी टँकरटँकरमुक्त जिल्हा म्हणून गेल्या 15 वर्षापासून नंदुरबारची ओळख होती. अपवाद फक्त धडगाव तालुक्यातील दुर्गम भागातील गौ:याचा बोदलापाडा या गावाचा. कारण तेथे उपाययोजना करूनही टँकरनेच पाणी पुरवावे लागत होते. यंदाच्या दुष्काळात मात्र 20 गावांना टँकर लागण्याची शक्यता आहे. अर्थात टंचाईची तीव्रता वाढेल त्याप्रमाणे त्यात आणखी वाढ देखील होऊ शकते. 20 गावांमध्ये सर्वाधिक 18 गावे ही नंदुरबार तालुक्यातील आहेत.    तर दोन गावे ही धडगाव तालुक्यातील आहेत. नंदुरबार तालुक्यातील पुव्रेकडील अर्थात रनाळा मंडळाअंतर्गत असलेल्या गावांना टँकर सुरू करावे लागणार आहे.88 खाजगी विहिरी अधिग्रहण करणारजिल्ह्यात एकुण 88 खाजगी विहिरी व विंधन विहिरी अधिग्रहीत करण्यात येणार आहेत. त्यात सर्वाधिक 63 विहिरी या नंदुरबार तालुक्यातील गावांमध्ये राहणार आहेत. त्या खालोखाल 21 विहिरी या शहादा तालुक्यातील गावांमध्ये, चार विहिरी या धडगाव तालुक्यातील गावांमधील असतील. याशिवाय 302 ठिकाणी नव्याने विंधन विहिरी देखील घेण्यात येणार आहेत. त्यात नंदुरबार तालुक्यात 10, नवापूर तालुक्यात 12, शहादा तालुक्यात 88, तळोदा तालुक्यात 26, अक्कलकुवा तालुक्यात 31 तर धडगाव तालुक्यात सर्वाधिक 135 विंधन विहिरींचा समावेश आहे. तात्पुरत्या नळ पाणी पुरवठा योजना या 19 गावांमध्ये घेण्यात येतील. त्यात नंदुरबार तालुक्यात सर्वाधिक 19 तर शहादा तालुक्यात तीन आणि नवापूर तालुक्यातील एका गावाचा समावेश आहे.याशिवाय 13 गावांमध्ये विहिर खोलीकरण, 22 गावांमध्ये प्रगती पथावरील पाणी पुरवठा योजनांची कामे पुर्ण केली जाण्याचे नियोजन आहे. त्यादृष्टीने जिल्हा प्रशासनाने आराखडा देखील तयार केला      आहे. संबधीत यंत्रणांना तशा सुचनाही दिल्या आहेत.