शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

नंदुरबारातील 22 महिलांना स्वयंरोजगाराचे जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 15:02 IST

भूषण रामराजे । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : देह विक्री व्यवसाय कायमचा सोडून देत 22 महिला सन्मानाच्या मार्गावर आल्या आहेत़ सन्मानाच्या मार्गाने जीवन जगण्याची महिलांची जिद्द आणि त्याला जिल्हा एड्स नियंत्रण संस्थेची मदत यातून या 22 महिला स्वयंरोजगार सन्मान दररोज कमावत आहेत़ नंदुरबार जिल्ह्यात देह विक्री करून गुजराण करणा:या तब्बल 1 हजार 100 ...

भूषण रामराजे । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : देह विक्री व्यवसाय कायमचा सोडून देत 22 महिला सन्मानाच्या मार्गावर आल्या आहेत़ सन्मानाच्या मार्गाने जीवन जगण्याची महिलांची जिद्द आणि त्याला जिल्हा एड्स नियंत्रण संस्थेची मदत यातून या 22 महिला स्वयंरोजगार सन्मान दररोज कमावत आहेत़ नंदुरबार जिल्ह्यात देह विक्री करून गुजराण करणा:या तब्बल 1 हजार 100 महिलांची नोंदणी आरोग्य विभागाकडून चालवल्या जाणा:या एडस नियंत्रण संस्थेकडून करण्यात आली होती़ यातील काहींनी संस्थेकडे या व्यवसायातून बाहेर पडण्याची तयारी बोलून दाखवली होती़ संस्थेच्या ऑऊट रिच वर्कर्स अर्थात ओआरटी कार्यकत्र्यानी या महिलांचे सातत्याने समुपदेशन करत त्यांना मूळ प्रवाहात आणण्यासाठी कसोशिने प्रयत्न केले होत़े या महिलांनी गेल्या दोन वर्षात देह विक्रीला पूर्णपणे नाकारात स्वयंरोजगार चालवला आह़े  त्यांना बँकांकडून कर्ज मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत़ या महिलांच्या नावाचा खुलासा संस्थेने केला नसला तरी शहादा आणि नंदुरबार येथील या 22 महिला आहेत़ याठिकाणी त्यांनी चहा स्टॉल, मेणबत्त्या व खडू बनवणे, ब्युटी पार्लर, शिवणकाम यासह विविध व्यवसाय फुलवले आहेत़ या सर्वच महिला कुटूंबासोबत चांगल्या मार्गाने जगत असल्याची माहिती देण्यात आली आह़े  एड्स नियंत्रण संस्थेकडून गेल्या सहा महिन्यात महिलांचे सातत्याने समुपदेशन करण्यात येत असल्याने वेश्या व्यवसायात ढकलल्या गेलेल्या 50 महिला त्यातून बाहेर निघण्याच्या प्रयत्नात आहेत़ यासाठी त्यांनी नुकतेच रोजगाराभिमुख प्रशिक्षण घेतले आह़े या महिलांना बँकांकडून मुद्रा योजनेद्वारे कर्ज मिळवून देण्याची तयारी विहान या संस्थेकडून दर्शवण्यात आल्याची माहिती देण्यात आली आह़े गत दोन वर्षात एड्स नियंत्रण संस्थेच्या माध्यमातून होणा:या उपक्रमांसाठी जिल्ह्यात एड्स बाधित आणि वेश्या व्यवसाय करणा:या महिलांसाठी काम करणा:या सेवाभावी संस्थेची मदत घेण्यात आली होती़ यासाठी दोन वर्षात काम करणारे कार्यकर्ते आणि महिलांच्या बैठका घेण्यात आल्या होत्या़ यात सातत्याने चर्चा झाल्याने हा बदल घडल्याची माहिती देण्यात आली आह़े एड्स नियंत्रण कार्यक्रमांतर्गत हे सर्व उपक्रम सुरू असताना 1 ऑगस्टपासून एड्स निमरुलन तसेच देहविक्री करणा:या महिला आणि तृतीयपंथी यांच्यासाठी काम करणारी एक संस्था बंद करण्याचे आदेश शासनाने काढले आहेत़ संबधित संस्थेकडून जिल्हाभरात नियुक्त करण्यात आलेल्या कार्यकत्र्याना वेतन दिले जात नसल्याने ही संस्था बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आह़े यामुळे देहविक्री करणा:या महिलांच्या प्रश्नावर काम करण्याचा संपूर्ण भार आता एडस नियंत्रण संस्था आणि विहान या खाजगी संस्थेवर आली आह़े गेल्या अनेक वर्षापासून सुरू असलेल्या बागलाण सेवा समिती या संस्थेतील कार्यकत्र्याना वेतन न दिल्याची तक्रार जिल्हाधिका:यांकडे करण्यात आली होती़ संबधित संस्थेने शासकीय अनुदान मिळूनही कार्यकत्र्याना सहा महिने वेतन न दिल्याचे स्पष्ट झाले होत़े याबाबत जिल्हा एड्स नियंत्रण संस्थेचे कार्यक्रम अधिकारी यांच्यासह प्रशासकीय पातळीवर चौकशी पूर्ण होऊन संस्था दोषी आढळल्याने काम बंद करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती आह़े यानुसार ही संस्था बंद केली गेली़ परिणामी देहविक्री करणा:या महिलांच्या समस्या सोडवण्याबाबत अडचणी येण्याची शक्यता वर्तवली जात आह़े नंदुरबार, शहादा यासह एकदोन ठिकाणी सुरू असलेल्या व्यवसायातील महिलांची जागृती करण्यासाठी डापकूतर्फे कार्यकर्ते सध्या नियुक्त करण्यात आले असून हे कार्यकर्ते ‘त्या’ महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी जात आह़े