४०० किलोवॅट वाहक वीज वाहिनीचा टॉवर कोसळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2020 12:59 PM2020-02-14T12:59:14+5:302020-02-14T12:59:26+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोठार : ४०० किलोवॅट वीज वाहून नेणाऱ्या उच्च वीज वाहक तारेचा टॉवर सतोना, ता.तळोदानजीक शेतात कोसळल्याची ...

2 kW carrier tower collapsed | ४०० किलोवॅट वाहक वीज वाहिनीचा टॉवर कोसळला

४०० किलोवॅट वाहक वीज वाहिनीचा टॉवर कोसळला

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
कोठार : ४०० किलोवॅट वीज वाहून नेणाऱ्या उच्च वीज वाहक तारेचा टॉवर सतोना, ता.तळोदानजीक शेतात कोसळल्याची घटना गुरुवार, १३ रोजी सकाळी घडली. यामुळे परिणात भितीचे वातावरण निर्माण झाले होते.
सरदार सरोवर प्रकल्पातून दोंडाईचा येथे येणारी ४०० किलोवॅट क्षमतेची वीज वाहिनी अक्कलकुवा व तळोदा तालुक्यातून जाते. यासाठी उंच टॉवर उभारण्यात आले आहेत. तळोदा-अक्कलुकवा रस्त्यावर सतोना फाट्यानजीक गुरुवारी या वीज वाहिनीचा टॉवर अचानक कोसळला. त्यामुळे आवाज झाला. टॉवर शेतात असल्यामुळे जीवीत हानी झाली नाही. परंतु हा टॉवर कोसळल्याने इतर टॉवरवरील वीज तारा ताणल्या गेल्याने त्यांनाही क्षती पोहचली आहे.
टॉवर उभा करण्यासाठी स्थानिक स्तरावर यंत्रणा नसल्यामुळे हा टॉवर पुर्ववत करून वीज पुरवठा सुरू करण्यासाठी काही दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. उच्च वीज वाहिनीच्या टॉवरांची वेळोवेळी देखभाल व दुरूस्ती होणे आवश्यक आहे. परंतु त्याकडे दुर्लक्ष होत असल्यो दिसून येत आहे.

Web Title: 2 kW carrier tower collapsed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.