शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

पिकअप वाहन उलटून १५ मजूर जखमी, खातगावनजीकची घटना

By मनोज.आत्माराम.शेलार | Updated: May 9, 2023 19:47 IST

१५ पैकी चार जण गंभीर जखमी, जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल

मनोज शेलार, नंदुरबार: नवापूर-खांडबारा रस्त्यावर वडदे ते खातगावदरम्यान दुचाकीस्वाराला वाचविण्याचा प्रयत्नात पिकअप वाहन उलटल्याने १५ जण जखमी झाले. यापैकी चारजण गंभीर जखमी झाले असून त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास गुजरात राज्यातील महुवा येथून मध्य प्रदेश राज्यातील डोहफोड येथे वीटभट्टीवर काम करणाऱ्या मजुरांना घेऊन पिकअप वाहन जात होते.

भरधाव असलेले वाहन दुचाकीचालकाला वाचविण्याच्या प्रयत्नात खातगावनजीक उलटले. त्यात बसलेले १५ मजूर जखमी झाले. जखमींमध्ये सुनील गोकुळ पाटील, गोपीराज चंद्र, कडू पाटील, नीलाबाई गोकुळ पाटील, पिंकी मनू महाजन, मनू चाफा महाजन, रोशन सुकलाल, जणूबाई नरेश जामकर, नरेश समाधान जामकर, समाधान मंगा जामकर यांच्यासह इतरांचा समावेश आहे.

अपघाताची माहिती मिळताच परिसरातील शेतात काम करणारे शेतकरी व मजूर मदतीला धावून आले. रुग्णवाहिकेद्वारे जखमींना खांडबारा व विसरवाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पैकी चौघांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनास्थळी विसरवाडी पोलिस कर्मचारी दिनेश चित्ते व अमरसिंग कोकणी यांनी धाव घेत मदतकार्य केले. खांडबाराचे सरपंच अविनाश गावित, शब्बीर खाटीक, मनोज चौधरी व बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्यांनी मदत केली.

टॅग्स :Accidentअपघात