शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

अज्ञात वाहनाच्या धडकत दुचाकीस्वार तरुण जागीच ठार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 16:27 IST

नांदेड ते नरसी महामार्गावर काकांडी शिवार जवळ अपघात

नवीन नांदेड: अज्ञात वाहनाच्या जबर धडकेने नांदगाव (ता. लोहा) येथील एक २६ वर्षीय तरुण जागीच ठार झाला आहे. ही घटना मंगळवारी (दि. १५) पहाटे ५ वाजेच्या दरम्यान नांदेड ते नरसी महामार्गावर काकांडी शिवार जवळ घडली.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नांदगाव (ता. लोहा) येथील तरुण लक्ष्मण श्रीराम भरकडे हा आज पहाटे ५ वाजेच्या सुमारास दुचाकीवर नांदेड येथून काकांडी मार्गे नांदगावकडे जात होता. दरम्यान, महामार्गावरील काकांडी शिवाराजवळ अज्ञात वाहनाने त्याला दुचाकीस पाठीमागून जोरदार धडक दिली. धडकेनंतर अज्ञात वाहन तेथून निघून गेले. यात गंभीर जखमी झालेल्या लक्ष्मणचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती ठाणे अंमलदार डी. एम. गिते व पो. कॉ. नितीन धुळगंडे यांनी दिली. लक्ष्मणच्या मृत्यूमुळे नांदगाव व मारतळा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्या पश्चात आई,वडील, पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. 

याप्रकरणी अवधूत श्रीराम भरकडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पो. नि. पंडितराव कच्छवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि. राजीव म्हात्रे, नाईक पो.कॉ. रामचंद्र पवार व नाईक पो. कॉ. नागनाथ दिपके हे याप्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

टॅग्स :Deathमृत्यूNandedनांदेडAccidentअपघात