शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

पुण्याहून परतलेल्या तरुण दाम्पत्याला घरच्यांनीही नाकारले; ग्रामस्थांनी हाकलले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 15:40 IST

व्यवसायानिमित्त हे दाम्पत्य पुणे येथे राहावयास गेले होते. तथापि, कोरोनामुळे गावाची ओढ त्यांना लागली. १८ मे रोजी हे दाम्पत्य कोल्हेबोरगाव येथे आले.

ठळक मुद्देपिण्याचे पाणीही कुणी दिले नाहीकोल्हेबोरगाव येथील घटना

बिलोली  (जि. नांदेड) : लॉकडाऊनमुळे  बिलोली तालुक्यातील कोल्हेबोरगाव येथील दाम्पत्य पुणे येथून गावात परतले. मात्र, त्यांना घेण्यासाठी घरच्यांनी नकार दिला. गावकऱ्यांनीही तिरस्कार केला. पिण्यासाठी पाणीही दिले नाही, असा भीषण प्रसंग त्यांच्यावर ओढवला.

व्यवसायानिमित्त हे दाम्पत्य पुणे येथे राहावयास गेले होते. तथापि, कोरोनामुळे गावाची ओढ त्यांना लागली. १८ मे रोजी हे दाम्पत्य कोल्हेबोरगाव येथे आले. त्यावेळी कटू प्रसंगाना तोंड द्यावे लागले. आपल्या संसाराचे गाठोड डोक्यावर घेऊन पत्नीसह तब्बल तीन तास त्यांना रखरखत्या उन्हात ताटकळत उन्हात उभे राहावे लागले. भुकेने व्याकूळ, तहानेने त्रासून गेलेल्या या दाम्पत्याच्या मदतीला ना रक्ताची नाती कामी आली, ना प्रशासन. घरच्या मंडळींसह ग्रामस्थांनी नाकारल्याने तरुण दाम्पत्याने कंधार तालुक्यातील रुई गावच्या माळरानात छोटी झोपडी टाकून तात्पुरता आधार घेतला आहे.  उपाशीपोटी दिवस काढण्याची वेळ आमच्यावर आली असून आयुष्यात कधीच न विसरणारा हा प्रसंग असल्याची प्रतिक्रिया दाम्पत्याने दिली. बिलोली तालुका प्रशासनाने जिल्हाबाहेरुन आलेल्या मजुरांसाठी शाळा, समाजमंदिर व गावाबाहेर क्वारंटाईन करुन ग्रामस्तरावर देखरेख समिती स्थापन केल्याचे सांगून स्वत:चा उदो-उदो करुन घेतला  खरा. प्रत्यक्षात कोल्हे बोरगाव येथे असे काहीच नसल्याचे भयावह चित्र या दाम्पत्यामुळे समोर आले. या दाम्पत्याला प्रशासनाने न्याय मिळवून देण्याची मागणी आता होत आहे.

उपाशीपोटी दिवस काढत आहोत गावकऱ्यांनी आमचा तिरस्कार केला... पाणीही दिले नाही... पत्नीसोबत शाळेत राहावयास तयार असताना शाळाही देण्यात आली नाही. रखरखत्या उन्हात आम्हाला गावाबाहेर काढण्यात आले आहे. आम्ही कंधार तालुक्यातील रुई गावच्या माळरानावर उपाशीपोटी दिवस काढत आहोत - काशीनाथ मानेमोड, स्वाती मानेमोड,  दाम्पत्य, कोल्हेबोरगाव ता. बिलोली.

क्वारंटाईनची सोय नाही सद्य:स्थितीत गावात घराव्यतिक्ति कसल्याच प्रकारची क्वारंटाईनची सोय करण्यात आली नसल्याने त्या दाम्पत्यांना गावाबाहेर राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. -नागोराव करेवाड, पोलीस पाटील, कोल्हेबोरगाव ता. बिलोली.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNandedनांदेडCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस