शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

बदनामीच्या तणावातून बारावीतील विद्यार्थिनीची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2020 12:56 IST

घरसोडून गेल्याच्या तणावातून केले कृत्य

लोहा (जि. नांदेड) : तालुक्यातील हळदव येथील बारावीत शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थीनीने बदनामी झाल्याच्या तणावातून मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता गळफास लावून जीवनयात्रा संपविली. या प्रकरणात याआधीच राहुल सदाशिव बडवणे (२२, रा. पिंपळगाव कोरका, ता. जि. नांदेड) याच्याविरुद्ध पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल झाला असून त्याला अटकही झाली आहे. 

२१ जानेवारी रोजी हळदव येथील साडेसतरा वर्षे वयाची निर्भया (नाव बदलले आहे) राहुल बडवणे याच्या सांगण्यावरून शिकवणीला जाते म्हणून घराबाहेर पडली व प्रवासी वाहनाने नांदेड येथे गेली. राहुलने मोबाईल फोनवरून अगोदरच निर्भयास तुला नोकरी मिळवून देतो, अशी फूस लावली होती. त्याच्या बोलण्यावर निर्भयाने विश्वास ठेवला आणि घर सोडले. इकडे घरच्यांनी आणि नातेवाईकांनी सर्वत्र शोधाशोध करूनही तिचा पत्ता लागला नाही. २१ रोजी सायंकाळी निर्भयाच्या कुटुंबाने नातेवाईकांसह लोहा पोलीस ठाण्यात धाव घेत मुलीच्या अपहरणाची तक्रार दाखल केली.

लोहा पोलिसांनी मुलीच्या मोबाईलचे टॉवर लोकेशन तपासले असता नांदेड येथील शिवाजीनगर दिसून आले. पोलीस पथक तात्काळ नांदेडला रवाना झाले. मात्र तिचा मोबाईल बंद असल्याने तपास पुढे सरकला नाही. दुसऱ्या दिवशी मुलीनेच घरच्या मंडळीस फोन करून मी नांदेड बसस्थानकात असल्याचे सांगितले. तेथून तिला परत आणण्यात आले. तिने लोहा पोलिसांत मला नोकरीचे आमिष दाखवून नांदेडला बोलावून घेतले व त्याच्या सांगण्यावरूनच मी मोबाईल करून घरच्यांना खोटी माहिती दिली, असा बयान दिला. यानंतर राहुल बडवणे यास २५ रोजी अटक करण्यात आली़ त्याच्याविरुद्ध पोस्कोअंतर्गत कलम ८ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला होता. सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे. तसेच अन्य एक अल्पवयीन आरोपी आहे. 

निर्भयाचे स्वप्न अधुरेनिर्भया ही हँडबॉल या क्रीडा प्रकारात निष्णात होती. तिला यातच करिअर करायचे होते. घरच्या मंडळींकडून लग्नाचा विचार होत होता. आता आपले स्वप्न पूर्ण होणार नाही, अशी भावना तिच्या मनात निर्माण झाली. दरम्यानच्या काळात  मोबाईलच्या माध्यमातून ती राहुलच्या संपर्कात आली. घर सोडल्यानंतर पहिल्याच दिवशी भ्रमनिरास झाल्याने दुसऱ्याच दिवशी तिने घरच्यांना फोन केला. घरी परत आलेल्या निर्भयाने बदनामीच्या तणावात स्वत:ला संपविले.

टॅग्स :Suicideआत्महत्याNandedनांदेडStudentविद्यार्थी