शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
3
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
4
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
5
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
6
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
7
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
8
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
9
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
10
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
11
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
12
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
13
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
14
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
15
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
16
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
17
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
18
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
19
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
20
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?

नांदेडमध्ये किटकॅट चॉकलेटमध्ये निघाली अळी, ग्राहकाची अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2023 21:02 IST

अन्न व औषध प्रशासनातील अधिकाऱ्यांनी या सुपर मार्केटमधील नेस्ले कंपनीच्या सर्व चॉकलेटचा साठा सील केला.

नांदेड : शहरातील एका नामांकीत सुपर मार्केटमध्ये खरेदी केलेल्या नेस्ले कंपनीच्या किटकॅट चॉकलेटमध्ये अळी निघाल्याचा प्रकार १६ फेब्रुवारी रोजी घडला आहे. या गंभीर प्रकाराची दखल घेऊन अन्न व औषध प्रशासनाने सुपर मार्केटमधील नेस्ले कंपनीच्या चॉकलेटचा सर्व साठा सील केला आहे.

यशोधरा नगर भागातील सुभाष दिगंबरराव भंडारे हे १६ फेब्रुवारी लातूर फाटा भागातील एका नामांकीत सुपर मार्केटमध्ये खरेदीसाठी गेले होते. यावेळी त्यांनी मुलांसाठी नेस्ले कंपनीचे किटकॅट चॉकलेट खरेदी केले. हे चॉकलेट खाण्यासाठी त्यांनी फोडले असता त्यामध्ये चक्क अळी निघाली.  ही बाब त्यांनी सुपर मार्केटच्या व्यवस्थापनाच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर तातडीने अन्न व औषध प्रशासन विभागाशी संपर्क साधून लेखी तक्रार केली. सुपर मार्केटमधील नेस्ले कंपनीच्या सर्व ब्रँडच्या सर्व बॅचच्या खाद्य पदार्थांची प्रयोगशाळेत तपासणी करावी, लहान मुलांच्या जीवाशी खेळणाऱ्या या कंपनीविरुद्ध तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.

चॉकलेटमध्ये अळी निघाल्यासंदर्भातील तक्रारीनंतर अन्न व औषध प्रशासनातील अधिकाऱ्यांनी नामांकीत सुपर मार्केटमध्ये जाऊन तेथील नेस्ले कंपनीच्या सर्व चॉकलेटची तपासणी केली व हा साठा सील केला. अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त संजय चट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली ऋषिकेश मरेवाड, संतोष कनकावाड यांनी ही कारवाई केली. तक्रार प्राप्त झालेल्या सुपर मार्केटमधील नेस्ले कंपनीच्या चॉकलेटचा संपूर्ण साठा सिल केला आहे. तसेच चॉकलेटचे नमुने पुणे येथील अन्न प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविले आहेत, असे अन्न व औषध प्रशासनाच्या  वतीने सांगण्यात आले.

टॅग्स :Nandedनांदेड