शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
6
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
9
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
10
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
11
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
12
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
13
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
14
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
15
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
16
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
17
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
18
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
19
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
20
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...

स्त्रीच्या उद्ध्वस्त आयुष्याची ‘सल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 00:18 IST

समाजामध्ये घडणा-या विविध घटनांचे पडसाद समाजातील सर्व घटकांवर कमी-अधिक प्रमाणात पडत असतात़ त्यात जर जातीय दंगली, सामाजिक विद्रोह, धार्मिक युद्ध असतील तर त्याचे परिणाम भयंकर असतात. ते परिणाम मुख्यत्वे करून स्त्रियांनाच भोगावे लागतात. मग ते कुठल्याही अंगाने असतील; पण त्रास, भोग, दु:ख हे स्त्रियांच्याच वाट्याला आलेले असतात़ यावर प्रकाश टाकणा-या ‘सल’ या नाटकामुळे रसिकांची मने हेलावून गेली होती़

ठळक मुद्देराज्य नाट्यस्पर्धा : अंतिम फेरीत एकापेक्षा एक सरस नाटके

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : समाजामध्ये घडणा-या विविध घटनांचे पडसाद समाजातील सर्व घटकांवर कमी-अधिक प्रमाणात पडत असतात़ त्यात जर जातीय दंगली, सामाजिक विद्रोह, धार्मिक युद्ध असतील तर त्याचे परिणाम भयंकर असतात. ते परिणाम मुख्यत्वे करून स्त्रियांनाच भोगावे लागतात. मग ते कुठल्याही अंगाने असतील; पण त्रास, भोग, दु:ख हे स्त्रियांच्याच वाट्याला आलेले असतात़ यावर प्रकाश टाकणा-या ‘सल’ या नाटकामुळे रसिकांची मने हेलावून गेली होती़महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धेच्या अंतिम फेरीत शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह येथे मराठी साहित्य, संस्कृती व कला मंडळ, वाशी नवी मुंबईच्या वतीने विवेक भगत लिखित अशोक पालवे दिग्दर्शित ‘सल’ हे नाटक सादर करण्यात आले़आपला काही गुन्हा नसताना, अपराध नसताना साराचे (दीपाली चौगुले) आयुष्य एका घटनेने उद्ध्वस्त झालेले असते. त्याच घटनेची सल, दु:ख तिच्या मनात कायमचे असते, शत्रू उघडपणे समोर नसतानासुद्धा आयुष्यभर त्याचा शोध घेणे. वर्तमानकाळ सांभाळून भूतकाळातल्या घटनेतल्या अपराध्याचा, भविष्यकाळात शोध घेणे, अशावेळी कुणाचीही साथ मिळत नाही, अगदी ज्यांना जवळचे समजतो तेसुद्धा ऐन वेळेला रंग बदलतात आणि अंतिम निर्णयाची वेळ येते, तेव्हा काळजावर दगड ठेवून कठोर निर्णय एक स्त्रीच घेवू शकते. अशाप्रकारे सारा खान तिच्या मनातले दु:ख या नाटकातून व्यक्त करते.या नाटकात अशोक पालवे यांनी साकारलेली इन्स्पेक्टर चव्हाणची भूमिका ही लक्षवेधी ठरली तर महेंद्र तांडेल आणि दीपाली चौगुले यांनी आपली भूमिका उत्तमरीत्या साकारली. नाटकाची जमेची बाजू म्हणजे श्याम चव्हाण यांची प्रकाशयोजना आणि कलावंतांचा अभिनय. नैपथ्य विवेक भगत, संगीत- अभिषेक भगत, रंगभूषा- देवा सरकटे, वेशभूषा- प्रिया पालवे यांनी साकारली तर रंगमंच व्यवस्था: निरंजन घरत, विदुला निरंजन, अतुल अंकुश यांनी सांभाळली.तर कुसुम सभागृहात सकाळी ‘भेटी लागी जिवा’ या नाटकातून अवघी पंढरी अवतरली होती़ बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने अभिजित दळवी लिखित, महेंद्र दिवेकर दिग्दर्शित ‘भेटी लागी जिवा’ हे नाटक सादर केले़ वेटिंग फोर गोदा हे सॅम्युलर बॅकेट यांनी १९५२ साली लिहिलेले अ‍ॅबसर्ड या प्रकारातील नाटक १९५४ च्या आसपास मंचित झाले. कित्येक देशांत त्यांचे प्रयोग झाले आणि वेगवेगळ्या धर्तीवरचे हे नाटक अनेक भाषांत भाषांतरितही झाले. त्या नाटकातील दीदी, गोगो हे दोन प्रमुख पात्रे आहेत़ ही पात्रे आता पंढरीच्या वारीत गोदाला शोधत आहेत. त्यांना देव हा मंदिरात नसून माणसात आहे. पांडुरंग हा देवळात नसून वारीला येणा-या भक्तासांबत तो निघून जातो, याचा साक्षात्कार होतो़