शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

नांदायला येणार की नाही? पतीने मोबाइल टॉवरवर चढून पत्नीस केला निर्वाणीचा व्हिडिओ कॉल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 17:16 IST

लोह्यात मोबाइल टाॅवरवर चढून पतीचे आंदोलन 

लोहा (जि.नांदेड) : माहेरी गेलेल्या पत्नीला नातेवाईक सासरी परत पाठवत नसल्याने पती शहरातील बसस्थानक परिसरातील  २०० फूट उंच मोबाइल टॉवरवर चढला. येथून व्हिडिओ कॉल करत नांदायला येणार की नाही असे निर्वाणीचे विचारत पतीने खाली उडी मारण्याची धमकी दिल्याची खळबळजनक घटना सोमवारी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास घडली. विशेष म्हणजे हे दांपत्य मुकबधिर आहे.

याबाबत प्राथमिक माहिती अशी की, शादुल शेख (रा. बेटमोगरा ता. मुखेड) याची पत्नी माहेरी गेली आहे. आठवडा उलटून गेला तरी पत्नी परत आली नाही. पत्नीचे माहेरचे नातेवाईक तिला नांदायला पाठवत नसल्याचे पती शादूलला समजले. यामुळे  टोकाचा निर्णय घेत पती सोमवारी सायंकाळी शहरातील बसस्थानक परिसरातील मोबाईल टॉवरवर चढला. वर चढण्यापूर्वी उडी मारून आत्महत्या करणार असल्याचे त्याने नातेवाईकांना सांगितले होते.

दरम्यान, शादुल शेख याने टॉवरच्या टोकावर जात तेथून पत्नीला व्हिडिओ कॉल केला. दोघेही पतीपत्नी मूकबधिर आहेत. दोघांत तब्बल एक तासांची चर्चा होऊन तोडगा निघाला. त्यानंतर हे थरारनाट्य थांबले. यावेळी गर्दी जमली होती. तब्बल एक तासाच्या थरारनाट्यानंतर पोलिस व नातेवाईकांच्या मध्यस्थीने पतीस टाॅवरवरून खाली उतरविण्यात यश आले.     

टॅग्स :NandedनांदेडCrime Newsगुन्हेगारी