शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कोर्टात घटस्फोटाचे प्रकरण असताना पत्नीला पतीपासून गर्भधारणेचा अधिकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2019 13:50 IST

गर्भधारणेची मागणी करणे हा पत्नीचा अधिकार आहे.

ठळक मुद्देन्यायालयाचा निर्णयफारकतीसाठी दाखल आहे दावा

नांदेड : पती-पत्नीत बिनसल्यानंतर न्यायालयात घटस्फोटाचे प्रकरण सुरू असताना पत्नीला पतीपासून गर्भधारणा करण्याचा अधिकार आहे, असा महत्वपूर्ण निकाल नांदेड कौटुंबिक न्यायालयाने दिला आहे.

येथील डॉ. प्रिया (नाव बदलले) यांचे लग्न मुंबई येथील डॉ. कुंतल पाल यांच्यासोबत २०१० मध्ये झाले होते. लग्नानंतर काही वर्षे हे जोडपे आनंदाने राहिले. त्यांना क्रिशांग हा मुलगाही झाला. परंतु त्यानंतर पती-पत्नीमध्ये वाद होऊ लागले. पत्नी डॉ. प्रिया हिने कौटुंबिक न्यायालयात अ‍ॅड. शिवराज पाटील यांच्यामार्फत प्रकरण दाखल केले. दरम्यानच्या काळात डॉ. कुंतल पाल यांनी पत्नीपासून फारकत मिळावी म्हणून मुंबई येथे प्रकरण दाखल केले. याप्रकरणात होणारा विलंब लक्षात घेता डॉ. प्रिया हिने पतीपासून बाळ व्हावे व तिला बाळ जन्माला यावे अशी इच्छा व गरज दाखविणारा अर्ज न्यायालयात दाखल केला. 

डॉ. पाल यांनी या अर्जाला विरोध केला. डॉ. प्रिया हिने पोटगीची कार्यवाही केली आहे. क्रिशांग या बाळाला १२ हजार रुपये एवढी पोटगी मंजूर झाली असून दुसरे बाळ जन्माला आल्यास तो सुद्धा पोटगी मागू शकतो. तसेच कायद्यामध्ये पती-पत्नीमध्ये वाद असताना पत्नी ही पतीकडून गर्भधारणा करण्याची मागणी करु शकत नाही, असा युक्तीवाद डॉ. पाल यांच्या वकिलांनी केला. डॉ. प्रिया यांच्यावतीने अ‍ॅड. शिवराज पाटील यांनी न्यायालयात १९९२ च्या जीआर नुसार उभयंतांना दोन मुलांपर्यंत जन्माला घालण्याचा अधिकार आहे. घटनेच्या कलम २१ प्रोटेक्शन आॅफ लाईफ अ‍ॅन्ड पर्सनल लिबर्टी आहे. आधुनिक तंत्रज्ञानानुसार पती-पत्नीने शारीरिक संबंध न ठेवताही सरोगशी तंत्रज्ञान वापरुन पती-पत्नी बाळाला जन्म देवू शकतात. गर्भधारणेची मागणी करणे हा पत्नीचा अधिकार आहे. या अधिकारापासून तिला कोणीही वंचित ठेवू शकत नाही, असा युक्तीवाद केला. यानंतर न्या. स्वाती चव्हाण यांनी सदर निर्णय दिला. 

तज्ज्ञ महिला डॉक्टरची  केली नियुक्तीन्यायालयाने दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून न्यायालयात प्रकरण सुरु असताना पत्नीला पतीपासून गर्भधारणेचा अधिकार असल्याचा महत्वपूर्ण निर्णय न्या. स्वाती चव्हाण यांनी दिला. तसेच या प्रक्रियेसाठी नांदेडातील तज्ज्ञ महिला डॉक्टरची नियुक्ती केली. अ‍ॅड. शिवराज पाटील यांना अ‍ॅड. मंगल पाटील, अ‍ॅड. गेठे, अ‍ॅड. वंदना पवार, अ‍ॅड. माया राजभोज, अ‍ॅड. भगवान कदम, सुशिल लाठकर, महेश संगनोर यांनी सहकार्य केले.

टॅग्स :Courtन्यायालयFamilyपरिवारPregnancyप्रेग्नंसीNandedनांदेड